Lokmat Agro >बाजारहाट > Kothimbir Market : नाशिक बाजार समितीत कोथिंबीर जुडीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market : नाशिक बाजार समितीत कोथिंबीर जुडीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Kothimbir Market market price of coriander in Nashik market is 260 rupees see details | Kothimbir Market : नाशिक बाजार समितीत कोथिंबीर जुडीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market : नाशिक बाजार समितीत कोथिंबीर जुडीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Kothimbir Market : नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात दैनंदिन पाठविल्या जाणाऱ्या कोथिंबीर मालाची रवानगी कमी प्रमाणात होत आहे.

Kothimbir Market : नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात दैनंदिन पाठविल्या जाणाऱ्या कोथिंबीर मालाची रवानगी कमी प्रमाणात होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kothimbir Market : गत दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत दमदारपणे पावसाने लावलेली हजेरी यामुळे आवक मंदावली आहे. परिणामी कोथिंबीर जुडीला चांगला भाव मिळत आहे. तसेच येत्या सोमवारी श्रीकृष्ण जयंती असल्याने कोथिंबीर मालाचे बाजारभाव वधारले आहेत. नाशिक बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या कोथिंबीर जुडीला २६० रुपये बाजारभाव मिळाला.

शुक्रवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Market Yard) विक्रीला आलेल्या कोथिंबीरच्या प्रतिजुडीला २६० रुपये बाजारभाव मिळाला. पावसामुळे शेतातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. परिणामी काही प्रमाणात शेतमालाची आवक घटली आहे.

नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात दैनंदिन पाठविल्या जाणाऱ्या कोथिंबीर मालाची रवानगी कमी प्रमाणात होत आहे. त्यात पावसाचा परिणाम आणि गुजरात राज्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने कोथिंबीर बाजारभाव तेजीत आल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे.

 
वाचा आजचे कोथिंबीरीचे बाजारभाव 
शुक्रवारी एका शेतकऱ्याने आणलेल्या कोथिंबीर जुडीला २६० रुपये भाव मिळाला. या शेतकऱ्याने अंदाजे २०० ते २५० जुड्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. तर  आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण कोथंबिरीला क्विंटलमागे 05 हजार 500 रुपये सरासरी दर मिळाला. तर कळमेश्वर बाजारात हायब्रीड कोथंबिरीला 5855 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 05 हजार रुपये, भुसावळ बाजारात 5500 रुपये असा दर मिळाला. तर नाशिक बाजार समितीत क्विंटलमागे सरासरी 08 हजार रुपये दर मिळाला.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/08/2024
कोल्हापूर---क्विंटल23350075005500
राहता---नग450687
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल12553560005855
अकलुजलोकलनग1900101513
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल30450055005000
पुणे -पिंपरीलोकलनग180072516
भुसावळलोकलक्विंटल14500060005500
पुणे-मोशीनं. ३नग2320081210

Web Title: Latest News Kothimbir Market market price of coriander in Nashik market is 260 rupees see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.