Kothimbir Market : गत दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत दमदारपणे पावसाने लावलेली हजेरी यामुळे आवक मंदावली आहे. परिणामी कोथिंबीर जुडीला चांगला भाव मिळत आहे. तसेच येत्या सोमवारी श्रीकृष्ण जयंती असल्याने कोथिंबीर मालाचे बाजारभाव वधारले आहेत. नाशिक बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या कोथिंबीर जुडीला २६० रुपये बाजारभाव मिळाला.
शुक्रवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Market Yard) विक्रीला आलेल्या कोथिंबीरच्या प्रतिजुडीला २६० रुपये बाजारभाव मिळाला. पावसामुळे शेतातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. परिणामी काही प्रमाणात शेतमालाची आवक घटली आहे.
नाशिक बाजार समितीतून गुजरात राज्यात दैनंदिन पाठविल्या जाणाऱ्या कोथिंबीर मालाची रवानगी कमी प्रमाणात होत आहे. त्यात पावसाचा परिणाम आणि गुजरात राज्यात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याने कोथिंबीर बाजारभाव तेजीत आल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे.
वाचा आजचे कोथिंबीरीचे बाजारभाव शुक्रवारी एका शेतकऱ्याने आणलेल्या कोथिंबीर जुडीला २६० रुपये भाव मिळाला. या शेतकऱ्याने अंदाजे २०० ते २५० जुड्या विक्रीसाठी आणलेल्या होत्या. तर आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण कोथंबिरीला क्विंटलमागे 05 हजार 500 रुपये सरासरी दर मिळाला. तर कळमेश्वर बाजारात हायब्रीड कोथंबिरीला 5855 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 05 हजार रुपये, भुसावळ बाजारात 5500 रुपये असा दर मिळाला. तर नाशिक बाजार समितीत क्विंटलमागे सरासरी 08 हजार रुपये दर मिळाला.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
24/08/2024 | ||||||
कोल्हापूर | --- | क्विंटल | 23 | 3500 | 7500 | 5500 |
राहता | --- | नग | 450 | 6 | 8 | 7 |
कळमेश्वर | हायब्रीड | क्विंटल | 12 | 5535 | 6000 | 5855 |
अकलुज | लोकल | नग | 1900 | 10 | 15 | 13 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 30 | 4500 | 5500 | 5000 |
पुणे -पिंपरी | लोकल | नग | 1800 | 7 | 25 | 16 |
भुसावळ | लोकल | क्विंटल | 14 | 5000 | 6000 | 5500 |
पुणे-मोशी | नं. ३ | नग | 23200 | 8 | 12 | 10 |