Join us

Kothimbir Market : नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीची विक्रमी आवक, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 2:23 PM

Kothimbir Market : पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीरची आवक प्रचंड वाढली आहे.

Kothimbir Market : पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक बाजार समितीमध्ये (Nashik Market Yard) कोथिंबीरची आवक प्रचंड वाढली आहे. शुक्रवारी जवळपास 85 हजार जुड्या विकल्या गेल्या. त्यानंतर शनिवारी देखील आवक वाढली होती. ओली झालेली कोथिंबीर 25 ते 35 रुपये जूडी असल्याचे भाजी विक्री त्यांनी सांगितले तर कोरड्या मालाला यापेक्षा जास्त भाव असल्याचे देखील दिसून आले.

आजच्या बाजार भाव अहवालानुसार कोल्हापूर बाजारात क्विंटलला 2500 रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजार समितीत (Pune Market Yard) सर्वाधिक दोन लाखाहून अधिक जुड्यांची आवक झाली. या बाजारात सरासरी जुडीला 08 रुपये दर मिळाला. भुसावळ बाजारात क्विंटल मागे सरासरी 02 हजार रुपये दर मिळाला. तर मंगळवेढा बाजार समितीत अवघ्या 02 रुपयांनी कोथिंबीरची जुडी विकली गेली.

तर कालचे बाजारभाव पाहिले असता कोल्हापूर बाजारात 3250 रुपये क्विंटलला भाव मिळाला. अहमदनगर बाजारात 2250 रुपये क्विंटलला भाव मिळाला. राहता बाजारात जोडीला सात रुपये पिंपरी बाजारात आठ रुपये, जळगाव बाजारात क्विंटलला 6 हजार 500 रुपये तर नागपूर बाजारात 5250 रुपये, तर कामठी बाजारात 05 हजार रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/08/2024
कोल्हापूर---क्विंटल53100040002500
पुणेलोकलनग2062275128
पुणे- खडकीलोकलनग2250576
पुणे -पिंपरीलोकलनग29006119
पुणे-मोशीलोकलनग3190011210
भुसावळलोकलक्विंटल46150025002000
मंगळवेढालोकलनग1800152
10/08/2024
कोल्हापूर---क्विंटल28150050003250
अहमदनगर---क्विंटल15590036002250
पुणे-मांजरी---नग3685052012
राहता---नग5505107
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल13404045004360
अकलुजलोकलनग2850587
सोलापूरलोकलनग4874300600400
जळगावलोकलक्विंटल24500080006500
पुणे -पिंपरीलोकलनग28006108
पुणे-मोशीलोकलनग255007109
जुन्नर - नारायणगावलोकलनग13490020137012001
नागपूरलोकलक्विंटल250300060005250
वडगाव पेठलोकलनग10007109
भुसावळलोकलक्विंटल16200025002200
मंगळवेढालोकलनग3265132
कामठीलोकलक्विंटल5450055005000
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिकभाज्या