Kanda Market : कांद्याची लासलगाव बाजारातील (Lasalgaon Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती २४३० रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत २१ टक्के घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवेकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २४ टक्के व १०० टक्के इतकी वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव बाजारात कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक २४३० रुपये क्विंटल होती, तर अहिल्यानगर बाजारात (Lal Kanda Market) सर्वात कमी किंमत १५२५ रुपये क्विंटल होती. कांद्याच्या किमतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत असून फेब्रुवारीच्या सुरुवातीला २ हजार ते २५०० च्या दरम्यान भाव मिळत होता.
त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यंतरी म्हणजेच १६ फेब्रुवारीच्या दरम्यान काहीशी भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुन्हा एकदा मागील आठवड्यात भावात घसरण पाहायला मिळाली असून हे दर २२०० रुपयांच्या खाली येऊन ठेपले आहेत.
मागील आठवड्यात काही निवडक बाजारातील बाजार भाव पाहिले असता लासलगाव बाजारात सरासरी २४३० रुपये, सोलापूर बाजारात १९२० रुपये, पिंपळगाव बाजारात २३०४ रुपये, अहिल्यानगर बाजारात १५२५ रुपये, तर पुणे बाजारात २१५० रुपये दर मिळाला.