Lokmat Agro >बाजारहाट > Lasalgaon Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये 03 नोव्हेंबरपर्यंत शेतमालाचे लिलाव बंद, वाचा सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये 03 नोव्हेंबरपर्यंत शेतमालाचे लिलाव बंद, वाचा सविस्तर 

Latest News Lasalgaon Kanda Market onion auction closed till November 03 in Lasalgaon market, read details  | Lasalgaon Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये 03 नोव्हेंबरपर्यंत शेतमालाचे लिलाव बंद, वाचा सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव मार्केटमध्ये 03 नोव्हेंबरपर्यंत शेतमालाचे लिलाव बंद, वाचा सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : दिवाळीनिमित्त लासलगाव मार्केटही आजपासून ते 03 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. 

Lasalgaon Kanda Market : दिवाळीनिमित्त लासलगाव मार्केटही आजपासून ते 03 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. 

शेअर :

Join us
Join usNext

Nashik : दिवाळी सणाला (Diwali Festival) सुरुवात झाली असून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक बाजार समितीमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यातील सर्वात मोठे कांदा मार्केट असलेले लासलगाव (Lasalgaon Kanda Market) मार्केटही आजपासून ते 03 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमधील मजूर हे गावी जात असल्याने लिलावाची (Onion Auction) कामे ठप्प होतात. शिवाय व्यापारी वर्गही दिवाळीनिमित्त सुट्टीवर जात असल्याने बाजार समिती लिलाव बंद ठेवले जाणार आहेत. त्यानुसार लासलगाव कांदा मार्केट देखील बंद राहणार आहे. बाजार समितीकडून सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की, आज मंगळवार दि.29 ऑक्टोबर रोजी भुसार व तेलीबिया या शेतीमालाचे लिलाव सकाळ-सत्रात होतील. 

तसेच बुधवार, दि.30 ऑक्टोबर ते शनिवार, दि. 02 नोव्हेंबर अखेर दिपावली सणानिमित्त मजूर वर्ग कामावर येणार नसल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया खरेदीदार लिलावाचे कामकाजात सहभागी होणार नाही. तरी शेतकरी बांधवांनी वरील दिवशी आपला भुसार व तेलबिया हा शेतीमाल विक्रीस आणु नये. तसेच सोमवार, दि. 04 नोव्हेंबरपासून कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालाचे लिलाव नियमितपणे सुरू राहतील. याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. 

04 नोव्हेंबरपासून लिलाव पूर्ववत 

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेती मालाचे लिलाव बंद राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे कांदा मार्केट असलेले लासलगाव मार्केट आजपासून बंद राहणार आहेत. या बाजार समितीत हजारो कामगार काम करत असतात. यात काही स्थानिक तर काही बाहेरगावावरून आले असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वजण गावी गेले आहेत. त्यामुळे चार ते पाच दिवस मार्केटमध्ये लिलाव बंद राहतील आणि 04 नोव्हेंबरपासून पुन्हा नियमितपणे लिलाव होतील, असे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: Latest News Lasalgaon Kanda Market onion auction closed till November 03 in Lasalgaon market, read details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.