Lasalgoan Kanda Market : होळी सणाच्या (Holi Festival) पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आज शेतमालाचे लिलाव बंद आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यातील प्रमुख लासलगाव बाजारपेठ (Lasalgaon kanda Market) देखील आजपासून पुढील पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर शेतमाल लिलाव होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आजचा होळी सण (Holi 2025) राज्यभरात साजरा केला जात आहे. होळी सणानंतर लागलीच धुलीवंदन आले आहे. अशातच राज्यातील अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यात लासलगाव कांदा मार्केट देखील आजपासून रविवार १६ मार्च पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल आणण्यापूर्वी बाजार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक १३.०३.२०२५ ते शनिवार दिनांक १५.०३.२०२५ पर्यंत (कामगार व मजूर वर्ग) होळी सण असल्याने कामकाजात सहभागी होणार नसल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारातील कांदा लिलाव बंद राहतील तसेच सोमवार दिनांक १७.०३.२०२५ पासून लिलाव नेहमीप्रमाणे सुरू राहतील, तरी शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी याची नोंद घावी, असे सांगण्यात आले आहे.