Lokmat Agro >बाजारहाट > Maize Market : महिनाभरात मका दरात बदल, वाचा आज काय मिळतोय बाजारभाव? 

Maize Market : महिनाभरात मका दरात बदल, वाचा आज काय मिळतोय बाजारभाव? 

Latest news Last month Rs 2200 per quintal Maize now Rs 2900 per quintal see details | Maize Market : महिनाभरात मका दरात बदल, वाचा आज काय मिळतोय बाजारभाव? 

Maize Market : महिनाभरात मका दरात बदल, वाचा आज काय मिळतोय बाजारभाव? 

Maka Bajarbhav : यंदा पावसामुळे मका पीक सध्या जोमात असून बाजारात मक्यात दिलासादायक दरवाढ होत आहे.

Maka Bajarbhav : यंदा पावसामुळे मका पीक सध्या जोमात असून बाजारात मक्यात दिलासादायक दरवाढ होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maize Market : यंदा पावसामुळे मका पीक (Maize Crop) सध्या जोमात आहे. बाजारात मक्यात दिलासादायक दरवाढ होत आहे. गत महिन्यात २२०० रुपये प्रतिक्विंटल असलेला मका आता २९०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. मागणी वाढली असली तरी बाजारात मका कमी प्रमाणात उपलब्ध आहे. २०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) केंद्र सरकारने मक्याला आधारभूत भाव २२२५ रुपये प्रतिक्विंटल इतका जाहीर केला आहे. त्यात यंदाचा हंगाम संपला असताना धान्य बाजारात काहीसा शुकशुकाट आहे. मात्र मक्याचे दर वाढले आहेत. 

२२०० रुपये प्रतिक्विंटल असलेल्या मक्यात (maize Market) आता तब्बल ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज मका २९०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. पण मागणी असून मका हा बाजारात उपलब्ध नाही, अशी स्थिती झाली आहे. इथेनॉल त्याचप्रमाणे स्टार्च फॅक्टरीसाठी लागणारा मका हा खरेदी केला जात आहे. तर मक्याने बाजारात तेजी दाखवली आहे. मका सध्या २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला जात आहे, अशी माहिती बोदवड येथील आडत व्यापारी पवन अग्रवाल यांनी  दिली.

मक्याचा बाजारभाव 

मक्याचा कालचा बाजार भाव पाहिला असता लासलगाव बाजारात 2600 रुपये, नागपूर बाजारात 2350 रुपये तर पाचोरा बाजारात 2300 रुपयांचा दर मिळाला. हा सर्वसाधारण मक्याला मिळालेला दर आहे. तर पिंपळगाव बसवंत- पालखेड बाजार समितीत आलेल्या हायब्रीड मक्याला 2480 रुपयांचा दर मिळाला. लाल मक्याला जालना बाजारात 2450 रुपये, अमरावती बाजारात 2050 रुपये, पुणे बाजार 2750 रुपये, अमळनेर बाजारात 2576 रुपये दर मिळाला.

तर मुंबई बाजारात आलेल्या लोकल मक्याला 3350 रुपयांचा दर मिळाला हा सर्वाधिक दर होता. तर पिवळ्या मक्याला धुळे बाजारात 2593 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 2375 रुपये, सिल्लोड बाजारात 2450 रुपये, मलकापूर बाजारात 2450 रुपये, चाळीसगाव बाजारात 2585 रुपये, तर यावल बाजारात 2800 रुपयांचा दर मिळतो आहे.

असे आहेत बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/07/2024
पुणेलालक्विंटल4280029002850
16/07/2024
लासलगाव----क्विंटल4257526512600
लासलगाव - निफाड----क्विंटल2222223302222
नागपूर----क्विंटल10220024002350
पाचोरा----क्विंटल10220024002300
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल40248024802480
जालनालालक्विंटल22230026002450
अमरावतीलालक्विंटल3200021002050
पुणेलालक्विंटल3270028002750
अमळनेरलालक्विंटल60256825762576
दौंड-केडगावलालक्विंटल15220024502300
मुंबईलोकलक्विंटल347240040003350
तासगावलोकलक्विंटल23219023402250
धुळेपिवळीक्विंटल4238523852385
मालेगावपिवळीक्विंटल50250026352593
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल2235024002375
चाळीसगावपिवळीक्विंटल9244326512585
सिल्लोडपिवळीक्विंटल68240025002450
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल8220024002300
मलकापूरपिवळीक्विंटल30242524702450
यावलपिवळीक्विंटल80160019901800

Web Title: Latest news Last month Rs 2200 per quintal Maize now Rs 2900 per quintal see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.