Lasun Bajarbhav : आजच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या बाजारभाव अहवालानुसार लसणाचा (Lasun Bajarbhav) दर प्रतिकिलो २५० ते ५०० रुपये असा आहे. तर फेब्रुवारी, मार्चमध्ये १०० रुपयांत ५ किलो या दराने लसणाची विक्री होत होती. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून भाव पुन्हा वधारले आहेत. यावेळी २५० ते ३०० रुपये रुपये प्रतिकिलो अशा दर वधारण्यास सुरवात झाली होती. सध्या चांगला प्रतीचा लसूण ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
राज्यभरात लसणाचे दर (Garlic Market) वधारले असून आज अकलूज बाजारात लोकल लसणाची ०५ क्विंटल आवक झाली. तर सोलापूर बाजारात १०७ क्विंटलचे आवक झाली. अनुक्रमे अकलूज बाजारात २० हजार रुपये क्विंटल तर सोलापूर बाजारात २५ हजार ८०० रुपये क्विंटल दर मिळाला.
तसेच छत्रपती संभाजी नगर बाजारात सर्वसाधारण लसणाला १९ हजार ५०० रुपये, चंद्रपूर -गंजवड बाजारात ३० हजार रुपये, राहता बाजारात २६ हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल लसणाला २५ हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये २२ हजार ५०० रुपये तर पुणे-मोशी बाजारात १८ हजार रुपये दर मिळाला.
आजचे दर पाहुयात
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
31/08/2024 | ||||||
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 17 | 12000 | 27000 | 19500 |
चंद्रपूर - गंजवड | --- | क्विंटल | 10 | 20000 | 33000 | 30000 |
राहता | --- | क्विंटल | 1 | 26000 | 26000 | 26000 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 168 | 20000 | 30000 | 25000 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 150 | 15000 | 30000 | 22500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 48 | 18000 | 18000 | 18000 |