Join us

Lasun Bajarbhav : लसणाचे प्रति किलो दर इतके 'रुपये', पाहुयात आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 4:23 PM

Lasun Bajarbhav : राज्यातील बाजारात लसणाची आवक कमी होत आहे, दर बाजारभाव तेजीत असल्याचे चित्र आहे.

Lasun Bajarbhav : आजच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या बाजारभाव अहवालानुसार लसणाचा (Lasun Bajarbhav) दर प्रतिकिलो २५० ते ५०० रुपये असा आहे. तर फेब्रुवारी, मार्चमध्ये १०० रुपयांत ५ किलो या दराने लसणाची विक्री होत होती. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून भाव पुन्हा वधारले आहेत. यावेळी २५० ते ३०० रुपये रुपये प्रतिकिलो अशा दर वधारण्यास सुरवात झाली होती. सध्या चांगला प्रतीचा लसूण ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

राज्यभरात लसणाचे दर (Garlic Market) वधारले असून आज अकलूज बाजारात लोकल लसणाची ०५ क्विंटल आवक झाली. तर सोलापूर बाजारात १०७ क्विंटलचे आवक झाली. अनुक्रमे अकलूज बाजारात २० हजार रुपये क्विंटल तर सोलापूर बाजारात २५ हजार ८०० रुपये क्विंटल दर मिळाला. 

तसेच छत्रपती संभाजी नगर बाजारात सर्वसाधारण लसणाला १९ हजार ५०० रुपये, चंद्रपूर -गंजवड बाजारात ३० हजार रुपये, राहता बाजारात २६ हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल लसणाला २५ हजार रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये २२ हजार ५०० रुपये तर पुणे-मोशी बाजारात १८ हजार रुपये दर मिळाला.

आजचे दर पाहुयात 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/08/2024
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17120002700019500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल10200003300030000
राहता---क्विंटल1260002600026000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल168200003000025000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल150150003000022500
पुणे-मोशीलोकलक्विंटल48180001800018000
टॅग्स :शेती क्षेत्र