Lokmat Agro >बाजारहाट > कल्याण बाजारात पशुधनाला काय बाजार मिळाला, आठवड्यातील पशुधनाचे बाजारभाव 

कल्याण बाजारात पशुधनाला काय बाजार मिळाला, आठवड्यातील पशुधनाचे बाजारभाव 

Latest News livestock market prices for week kalyan bajar | कल्याण बाजारात पशुधनाला काय बाजार मिळाला, आठवड्यातील पशुधनाचे बाजारभाव 

कल्याण बाजारात पशुधनाला काय बाजार मिळाला, आठवड्यातील पशुधनाचे बाजारभाव 

सद्यस्थितीत पशुधनाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक बाजारात आवक देखील वाढत आहे.

सद्यस्थितीत पशुधनाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक बाजारात आवक देखील वाढत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सद्यस्थितीत पशुधनाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक बाजारात आवक देखील वाढत आहे. पशुधनामध्ये गाय, म्हैस, बोकड, बैल आदींची खरेदी विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी बाजार पाहून खरेदी विक्री करीत आहेत. 

राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार कल्याण बाजारात क्रॉस ब्रीड तीन कालवडीची आवक झाली. यावेळी प्रती कालवड कमीत कमी 30 हजार तर सरासरी 34 हजार रुपये बाजार मिळाला. तर कल्याण बाजारातच लोकल तीन कालवडीची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 20 हजार तर सरासरी 30 हजार रुपये बाजार मिळाला. कल्याण बाजार समिती क्रॉस ब्रीड केलेल्या तीन गायींची आवक झाली. प्रती गाय कमीत कमी 45 हजार रुपये तर सरासरी 55 हजार रुपये बाजार मिळाला. तर याच बाजारात लोकल गायीला कमीत कमी 38 हजार तर सरासरी 40 हजार रुपये बाजार मिळाला. 

भिवंडी बाजार समितीत 2310 नग बकरीची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 3500 रुपये तर सरासरी 4500 रुपये बाजार मिळाला. जुन्नर -बेल्हे    बाजारात 528 जनावरांची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 5000 रुपये तर सरासरी 18000 रुपये बाजार मिळाला. कल्याण बाजारात म्हशींच्या तीन नगांची आवक झाली. या बाजारात कमीत कमी 70 हजार रुपये तर सरासरी 80 हजार रुपये बाजार मिळाला. 

Web Title: Latest News livestock market prices for week kalyan bajar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.