Agriculture News : राज्यातील बाजार समित्यांना (bajar samiti) त्यांच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारांमध्ये विकासात्मक कामे हाती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून अल्प व दीर्घ मुदतीची कर्जे दिली जातात. यामध्ये बाजार समिती आवारातील विविध वास्तूंचा समावेश होतो. सदरचे कर्ज (Loan Scheme) कृषि पणन मंडळाच्या नियमानुसार मंजूर केले जाते. कृषि पणन मंडळाकडे (krushi Panan Mandal) बाजार समित्या त्यांच्या विविध विकास कामांसाठी आवश्यक असणाऱ्या कर्जाचे प्रस्ताव सादर करतात.
कर्जासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे
विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज.
कर्ज परतफेडीचा करारनामा.
मालमत्तेचे मंजुर कर्ज रकमेच्या मुल्यांकनाचे नोंदणीकृत गहाणखत.
बाजार समितीचे संचालक मंडळाचे क्षतिपुर्ती बंधपत्र.
बांधकामाचा नकाशा व आराखड्यास सक्षम अधिकाऱ्यांची मंजूरी.
कलम १२ (१) अंतर्गत मान्यता पत्र.
कलम ३२ (१) अंतर्गत मान्यता पत्र.
कर्जाची परतफेडीची मुदत
पिण्याच्या पाण्याची सोय, लिलाव ओटे, कुंपण, भुईकाटे, इतर काटे, ग्रेडिंग साहित्य, स्वच्छतागृहे, रस्ते, रस्ते डांबरीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, शेतकरी निवास व इतर सोयी या सर्व कामासाठी १० वर्ष मुदत फेड असते. तर आडते गाळेसाठी ५ वर्षे, व्यापारी (कमर्शियल) गाळे (अंतरीम कर्ज) यासाठी १ वर्षे, शेतमाल तारण कर्ज ६ महिने साठी असते.
दरम्यान महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने मागील ३७ वर्षात (सन १९८६-८७ ते २०२२-२३), एकूण रु.३२१.७३ कोटी इतके कर्ज रुपात २८० बाजार समित्यांना अर्थ सहाय्य उपलब्ध केलेले आहे. तसेच शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत सन १९९०-९१ पासून राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमार्फत शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्जापोटी रु.२५६.०९ कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे.