Maka Bajar bhav : मक्याची आवक बाजारात (Maka Avak) सुरु असून सद्यस्थितीत कमीत १५०० रुपये तर सरासरी २२५० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. पुढील पंधरा दिवस म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत (Akshay Trutiya) दर कसे मिळतील? ते थोडक्यात समजून घेऊयात...
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसन्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन (Maize Production) मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ७४.१२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशात चालू वर्षीच्या फेब्रुवारी २०२५ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या फेब्रुवारी २०२४ च्या तुलेनत ४४.५९ टक्क्यांनी वाढली आहे.
तर खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) २२२५ रुपये प्रति क्विटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या एप्रिल महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर एप्रिल २०२२ रुपये २१८६ प्रति क्विंटल, एप्रिल २०२३ रुपये १९२५ प्रति क्विंटल, एप्रिल २०२४ रुपये २०२९ प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. एप्रिल २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारात २१०० रुपये ते २४०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळण्याची शक्यता आहे.
उत्पादनात घट होण्याचा अंदाज
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात २०२४-२५ मध्ये ६ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, जी २०२३-२४ च्या तुलनेत २५% घट होईल असा अंदाज आहे. देशांतर्गत किमती वाढल्यामुळे आणि पिक कमी झाल्यामुळे २०२३-२४ या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निवांकी पातळीवर घसरली.
इथेनॉल, कुक्कुटपालन आणि स्टार्थ उत्पादकांकडून वाढवलेल्या मागणीमुळेही निर्यातीत घट झाली. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, भारतात मागील वर्षांच्या तुलनेत १.५ टक्के मक्याचे उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मक्याचे उत्पादनात ०.९० टक्के वाढ होण्याचा असा अंदाज आहे.