Maka Bajarbhav : केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या पहिल्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन 2024-25 मध्ये एकूण मक्याचे उत्पादन (Maize Production) मागील वर्षाच्या तुलनेत 13.87 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन 2023-24 मध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत 1.5 टक्के मक्याचे उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
तसेच सन 2023-24 च्या तुलनेत 24-25 मध्ये मक्याच्या उत्पादनात 0.90 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने 26 जून 2024 रोजी एकूण पाच लाख टन मका आयातीची (Maize Import) अधिसूचना जाहीर केली आहे. तर देशात चालू वर्षाच्या आक्टोबर 2024 मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 56.29 टक्क्यांनी वाढली आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात 2024-25 मध्ये 06 लाख मॅट्रिक टन होण्याचा अंदाज आहे, जी 2023-24 च्या तुलनेत 25 टक्के घट होईल, असा अंदाज आहे. तर देशांतर्गत किमती वाढल्यामुळे आणि पीक कमी झाल्यामुळे 2023-24 या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निचांकी पातळीवर घसरली. इथेनॉल, कुकूटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळे ही निर्यातीत घट झाली.
असे राहतील बाजारभाव
तर मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या जानेवारी ते मार्च महिन्यातील सरासरी किमतीचा अहवाल पाहिला तर 2022 मध्ये 1786 रुपये प्रतिक्विंटल, 2023 मध्ये 2103 रुपये, प्रतिक्विंटल तर 2024 मध्ये 2190 रुपये प्रति क्विंटल (Maka Bajarbhav) असा दर मिळाला.
तर खरीप हंगाम 2024-25 साठी मका पिकाचे आधारभूत किंमत 2225 रुपये प्रतिक्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार जानेवारी ते मार्च 2025 या महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किमती या 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल अशा असण्याची शक्यता आहे.