Maka Bajarbhav : मक्याचे साप्ताहिक बाजारभाव (Maize Price) पाहिले असता जूननंतर या बाजारभावांत काही काहीसा बदल दिसून आला. जुलैमध्ये साधारण 2400 रूपये ते 2500 रुपये असा सरासरी दरम्यान होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये 2500 रुपये ते 2600 रुपये असा दर मिळाला. सप्टेंबरमधील दर पाहिले असता 2600 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे.
मागील आठवड्यात नांदगाव बाजारात (Nandgoan Market) मक्याची किंमत रु. 2550 रुपये प्रती क्विंटल होती. या आठवड्यात देखील किंमत मागील आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. तर इतर बाजार समितीमधील दर पाहिले असता येवला बाजारात 2622 रुपये, क्विंटल मालेगाव बाजारात 2635 रुपये, क्विंटल मनमाड बाजारात 2732 रुपये क्विंटल तर अमळनेर बाजारात 2708 रुपये क्विंटल असा दरम्यान मिळाला.
मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे 23.66 टक्के व 16.16 टक्के इतकी घट झाली आहे. मागील आठवड्यातील मक्याची आवक पाहिली असता राज्यात जूनपासून आवकेत घट झाली झाली आहे. मात्र आता पुढील आठवड्यात आवकेत वाढ होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम 2023-24 साठी किमान आधारभूत किंमत रु. 2090 प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत. खरीप हंगाम 2024-25 साठी किमान आधारभूत किंमत रु. 2225 प्रती क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे.