Maka Market : राज्यातील शेतकऱ्यांचा मका काढणीला (Maize Market) आला असून दुसरीकडे बाजारभावात घसरण झाली आहे. मागील आठवड्यातील बाजार भाव पाहिले असता कमीत कमी २४०० रुपयांपासून ते सरासरी २६०० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. मागील हप्त्यात सरासरी २४९० रुपये दर मिळाला.
मागील आठवड्यात नांदगाव बाजारात (Maize Bajarbhav) मक्याची किंमत २४९० रुपये प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे. तर येवला बाजारात २६६७ रुपये, मालेगाव बाजारात २१८५ रुपये, मनमाड बाजारात २४८४ रुपये तर अमळनेर बाजारात २६५२ रुपये दर मिळाला.
तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय १८.०३ टक्के इतकी घट झाली आहे, परंतु राज्य पातळीवर २८.८५ टक्के इतकी वाढ झाली आहे. यात मागील आठवड्यातील आकडेवारी पाहिले असता एक टनांपर्यंत आवक येऊन ठेपले आहे. मात्र आता हळूहळू नवा मका काढणीला आला असल्याने बाजारात आवक वाढेल.
आजचे बाजारभाव
सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत. खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. २०९० प्रती क्विटल आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे. तर आज पुणे बाजारात लाल मक्याला क्विंटलमागे २८५० रुपये, तर अमरावती बाजारात २०५० रुपये दर मिळाला.