Maka Bajarbhav : मक्याचे मागील आठवड्यातील बाजारभाव पाहिले असता (दिनांक १९ ते २५ ऑगस्ट २०२४) नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु. २६०० प्रती क्विंटल होती. तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १२.२८ टक्के व १६.२६ टक्के इतकी घट झाली आहे. त्यानुसार आवकेत घट झाली असून शेतकऱ्यांना मात्र समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे.
सद्यस्थितीत मका पीक बहरात आले असून शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिलेला मका बाजारात येत आहे. त्यामुळे बाजारातील आवक घटल्याचे चित्र आहे. साप्ताहिक बाजार अहवालानुसार जून महिन्यात देशभरात मक्याची २०० टन, जुलैमध्ये १५० टन, ऑगस्टमध्ये १०० टनावर आवक आली आहे. तर राज्यातील स्थिती पाहता जूनमध्ये ५० टन, जुलैमध्ये ४६ टन, ऑगस्टमध्ये ४२ टनावर आवक आली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १२.२८ टक्के व १६.२६ टक्के इतकी घट झाली आहे.
तर खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. २०९० प्रती क्विंटल आहे. मात्र सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. काही बाजार समित्यांमधील भाव पाहिले असता, नांदगाव बाजारात २६०० रूपये, मालेगाव बाजारात २५८३ रुपये, येवला बाजारात २५३६ रुपये, मनमाड बाजारात २६७० रुपये, २५८४ रुपये दर मिळाला.
आजचे मका बाजारभाव
आजच्या बाजारभाव अहवालानुसार मक्याला पाचोरा बाजारात 2571 रुपये, अमरावती बाजारात लाल मक्याला 2050 रुपये, जळगाव बाजारात 2300 रुपये, तर पुणे बाजारात 3000 रुपये आणि अमळनेर बाजारात 2800 रुपये दर मिळाला. तर मुंबई बाजारात लोकल मक्याला 04 हजार 200 रुपये, तासगाव बाजारात 2210 रुपये आणि पैठण बाजारात पिवळ्या मक्याला 2850 रुपये असा दर मिळाला.