Maka Bajarbhav : मक्याच्या किमतीमध्ये सातत्याने घसरण (Maize Rate Down) सुरू असून मागील आठवड्यात काहीशी वाढ दिसून आली. मात्र मक्याच्या किमती या एमएसपी पेक्षा कमीच असल्याचं चित्र आहे. ऑक्टोंबर महिन्यात दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव होता. मात्र नोव्हेंबरच्या शेवटी १९०० रुपयांपर्यंत हा दर येऊन ठेपला आहे.
मागील आठवड्यात नांदगाव बाजारात (Nandgoan Maize Market) मक्याची किंमत रु.१९५० प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा कमी आहेत.
मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या (Maka Weekly Market) आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १३.६० व ४१.७५ टक्के इतकी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक रु. २२२५ रुपये क्विंटल होती, तर जालना बाजारात सर्वात कमी किंमत रु. १७८५ रुपये क्विंटल होती. तर मक्याच्या आवकेचा विचार केला तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ०६ हजार टनांपर्यंत होती, मात्र सद्यस्थितीतमध्ये नोव्हेंबरच्या शेवटी यावर ३५०० टनांपर्यंत येऊन पोहोचली आहे.
तर बाजारभावाचा विचार केला तर नांदगाव बाजारात १९५० रुपये क्विंटल, अमळनेर बाजारात २२२५ रुपये क्विंटल, धुळे बाजारात २०५६ रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजारात १९२८ रुपये प्रतिक्विंटल, तर जालना बाजारात १७८५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.