Join us

Maka Bajarbhav : ओला मका खरेदीचा श्रीगणेशा, काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 2:36 PM

Maka Bajarbhav : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) यंदा मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून खरेदीचा श्री गणेशा झाला.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) यंदा मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. या हंगामात मका खरेदीचा श्री गणेशा झाला. यात मक्याला तब्बल २१५० रुपयांनी खरेदीचे दर मिळाले आहेत. ही दरवाढ कायम राहिल, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे जुन्या मक्याला क्विंटलमागे सरासरी कमीत कमी २४०० रुपये ते  २८०० रुपये दर मिळतो आहे. 

जळगाव जिल्ह्यात यंदा मका लागवड (Maize Cultivation) मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला मक्याला चांगला भावही (Maize Market) मिळाला आहे. गणेश स्थापनेचा मुहूर्त पाहून बाजारात मका खरेदीला अनेक ठिकाणी सुरुवात करण्यात आली. आज बाजारात ओला अर्थात आर्द्रता असलेला मका तब्बल २१५० रुपये प्रतिक्विंटलच्या भावाने विकला गेला आहे. 

आजच्या बाजार अहवालानुसार पुणे बाजारात आलेल्या लाल मक्याला (Maka Bajarbhav) कमीत कमी २७०० रुपये तर सरासरी २८०० रुपये दर मिळाला आहे. तर काल सिल्लोड बाजारात पिवळ्या मक्याला कमीत कमी २५०० रुपये आणि सरासरी २६०० रुपये आणि बुलढाणा बाजारात कमीत कमी २ हजार रुपये आणि सरासरी २४०० रुपये दर मिळाला आहे. 

दोन दिवसांपूर्वीचा बाजारभाव 

१४ सप्टेंबर २०२४ रोजीचा बाजारभाव पहिला असता लासलगाव-निफाड बाजारात सर्वसाधारण मक्याला क्विंटलमागे २५७५ रुपये, पाचोरा बाजारात १६५१ रुपये, मनमाड बाजारात हायब्रीड मक्याला २४२१ रुपये, सोलापूर बाजारात लाल मक्याला २५०० रुपये, जालना बाजारात २७०० रुपये, पुणे बाजारात २८५० रुपये आणि अमळनेर बाजारात २७५१ रुपये दर मिळाला. तर मुंबई बाजारात लोकल मक्याला ४२०० रुपये दर मिळाला.

टॅग्स :मकामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती