Join us

Maka Market : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मक्याला काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 4:13 PM

Maka Market : मागील आठवड्यातील मक्याचे बाजार भाव पाहिले असता सरासरी 2550 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

Maize Market : मागील आठवड्यातील मक्याचे बाजार भाव (Maize Market) पाहिले असता सरासरी 2550 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तर शासनाच्या किमान आधारभूत किंमत ही 2 हजार 90 रुपये आहे.  त्यामानाने मक्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. एकूणच या आठवड्यात काय बाजार भाव मिळाला व कशी होती ते सविस्तर पाहूयात..

मागील आठवड्यात नांदगाव बाजारात (Nandgaon Maize Market) मक्याची किंमत रु. २५५० प्रती क्विंटल होती. या आठवड्यात देखील किंमत मागील आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. तर मागील आठवड्यात राज्यातील निवडक बाजार समित्यांमधील मक्याचा बाजारभाव पाहिला असा नांदगाव बाजारात 2550 रुपये, येवला बाजारात 2536 रुपये, मालेगाव बाजारात 2476 रुपये, मनमाड बाजारात 2587 रुपये, तर अमळनेर बाजारात 2503 रुपये दर मिळाला होता.

तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १७.९१% व १९.२४% इतकी घट झाली आहे. खरीप हंगाम २०२३-२४ साठी किमान आधारभूत किंमत रु. २०९० प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा जास्त आहेत. खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमात आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल जाहीर करण्यात आलेली आहे.

आजचे मका बाजारभाव 

तर आजचे बाजारभाव पाहिले असता आजच्या बाजार अहवालानुसार अमरावती बाजारात लाल माक्याला 2050 रुपये, बुलढाणा बाजारात पिवळ्या माक्याला 2445 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 2292 रुपये, जळगाव बाजारात 2331 रुपये, नागपूर बाजारात 2350 रुपये, नंदुरबार बाजारात 2461 रुपये, पुणे बाजारात 2700 रुपये तर सोलापूर बाजारात 2590 रुपये दर मिळाला.

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/08/2024
अमरावतीलालक्विंटल3200021002050
बुलढाणापिवळीक्विंटल24230025302445
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल4225023382292
जळगाव----क्विंटल9220025502331
जळगावपिवळीक्विंटल14247027002475
नागपूर----क्विंटल5220024002350
नंदुरबारपिवळीक्विंटल3246124612461
परभणीलोकलक्विंटल1180018001800
पुणेलालक्विंटल2260028002700
सोलापूरलालक्विंटल32259026152590
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)97
टॅग्स :मकामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती