Join us

मालेगाव बाजार समिती लिलाव नाहीच, शासन निर्णय येईपर्यंत बेमुदत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 12:44 PM

पुढील निर्णय शासनस्तरावर येईपावेतो मालेगाव बाजार समिती बेमुदत बंद असल्याचे सांगण्यात आले.

मालेगाव : नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या हमाल मापाडीच्या मजुरीत वाढ व्हावी, या मागणीसाठी महिन्याभरापासून बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहे. परिणामी बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य मजुरांना मोठा फटका बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व हमाल मापाडीची बैठक बोलविण्यात आली होती. परंतु व्यापारी व हमाल मापाडी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे पुढील निर्णय शासनस्तरावर येईपावेतो बाजार समिती बेमुदत बंद असल्याचे सांगण्यात आले.

मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, हमाल, मापाडी यांची एकत्रित बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी उपस्थित उपसभापती अॅड. चव्हाण म्हणाले की, गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक मान्सून न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पन्न घेतले आहे. त्यात लग्नसराई व आर्थिक व्यवहार करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे मालेगाव, मुसंगे, झोडगे, टेहरे बाजार समितीत कांदा, मका व अन्य पिकांची आवक वाढली आहे परंत

हमाल माथाडी संघटनेच्या प्रश्न सरकारकडून सुटत नसल्याने महिन्याभरापासून बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान व आर्थिक अडचणीला सामारे जावे लागत आहे. बाजार समित्या बंदच्या निर्णयानंतर १ ते २ आठवडाभरात निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु हमाल मापाडीचे प्रश्न लवकर सुटत नसतील तर तोपर्यंत पर्यायी मार्ग काढत बाजार समिती सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा उपसभापती अॅड. चव्हाण यांनी व्यक्त केली.

...तर बाजार समिती धोक्यात येतील

व्यापारी किंवा हमाल मापाडी वर्ग संघटित असल्याने सहज आंदोलनात सहभागी होऊन बंद हाक देऊ शकतो; परंतु शेतकरी व्यापारी, बाजार समिती व हमाल मापाडी यांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असताना कधी संपावर जात नाही; परंतु वारंवार बंदचा निर्णयामुळे सर्वांचे नुकसान निश्चितच होणार आहे. मुंगसे बाजार समिती एक हजार वाहने लिलाव सहभागी होत होते. बंद असल्याने लहानांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपासून सर्वांचे व्यवहार ठप्प झाले आहे. बाजार समिती बंद राहत असल्याने वाके व चंदपुरी येथे खासगी बाजार समिती सुरू झाली आहे. बंद असल्याने शेतकरी आपला माल खासगी समितीत विकू लागला आहे. वेळीच बंदचा निर्णय मागे न घेतल्याने बाजार समिती धोक्यात येऊन त्याचा फटका व्यापाऱ्यांसह सर्वांना बसेल असे उपसभापती अॅड. चव्हाण यांनी सांगितले.

सरकार निर्णय घेईपर्यंत बाजार समिती सुरू ठेवा

हमाल मापाडी यांच्या मागण्यांना आमचा विरोध नाही. परंतु लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू असल्याने सरकारकडून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे निर्णयाची वाट पाहून शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याने आचारसंहिता कालावधीत व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवावे, याबाबत बाजार समितीत बैठक घेऊन निर्णय देखील झाला होता. परंतु सहकार्य न मिळाल्याने पुन्हा बाजार समिती बंद ठेवण्याची वेळ आल्याचे भिका चव्हाण यांनी सांगितले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेतीमार्केट यार्डमालेगांवकांदा