Join us

बाजार समित्या बंद, आजचे कांदा बाजारभाव काय? 

By गोकुळ पवार | Published: December 09, 2023 4:05 PM

केंद्राच्या निर्यातबंदीनंतर आजपासून अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले.

केंद्राच्या निर्यातबंदीनंतर आजपासून अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र होते. त्यानंतर केवळ एक दोन बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले. त्यानुसार आज लाल कांद्याला सरासरी 2600 रुपये बाजार भाव मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 3900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 

एकीकडे केंद्र सरकराने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकरी, व्यापारी वर्ग पुन्हा आक्रमक झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे आजचे बाजारभाव नेमके समजू शकले नाही. मात्र लासलगाव-विंचूर आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सकाळी आणि दुपारी कांद्याचे लिलाव पार पडले. त्यानुसार आज लाल कांद्याला सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला 3900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. त्यानुसार निर्यात बंदीच्या निर्णयामुळे बाजारभावात मोठी तफावत पाहायला मिळाली. त्यामुळे आता लिलाव कधी सुरु होणार याकडे लक्ष लागून आहे. 

तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांची आकडेवारी पाहिली असता कोल्हापूर जिल्ह्यात 6903 क्विंटल कांद्याची अवाक झाली. तर कमीत कमी 1500 रुपये दर मिळाला.     जास्तीत जास्त 4500 रुपये दर मिळाला. तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. अकोला जिल्ह्यात 1140 क्विंटल कांद्याची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2000 बाजारभाव मिळाला. तर जास्तीत जास्त 3500 रुपये, तर सरासरी प्रति क्विंटल कांद्याला 2800 रुपये बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगरला सरासरी 2500 रुपये, बारामती सरासरी 3000 रुपये, जळगावला सरासरी 1500 रुपये, नागपूरला सरासरी 3625 रुपये, अमरावती- फळ आणि भाजीपाला सरासरी 2600 रुपये, पुणे -पिंपरी सरासरी 3600 रुपये दर मिळाला. 

केंद्राच्या निर्यातबंदीनंतर राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---क्विंटल6903150045002600
अकोला---क्विंटल1140200035002800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2310120038002500
विटा---क्विंटल45300045003750
हिंगणा---क्विंटल2220022002200
कराडहालवाक्विंटल201350045004500
बारामतीलालक्विंटल627100040003000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल5950100030002600
जळगावलालक्विंटल176852723771500
धाराशिवलालक्विंटल29110035002350
पंढरपूरलालक्विंटल26240040002500
नागपूरलालक्विंटल1380250040003625
राहूरी -वांबोरीलालक्विंटल185150035002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल510100042002600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3360036003600
पुणे-मोशीलोकलक्विंटल568100035002250
नागपूरपांढराक्विंटल1000300040003750
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2300120032252500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल400135143823900
भुसावळउन्हाळीक्विंटल9200030002500
टॅग्स :कांदानाशिकशेतीमार्केट यार्ड