आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह असून जयंतीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश बाजार समित्या बंद आहेत. बाजार समित्या बंद असल्याने अनेक लिलाव बंद आहेत. तर मोजक्याच बाजार समित्यामध्ये आज लिलाव पार पडले आहेत. उद्यापासून पुन्हा सुरळीतपणे बाजार समित्या सुरु राहतील असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती दिवस आज असून बहुतांश बाजार समिती प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या लासलगाव बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. त्याचबरोबर पिंपळगाव बाजार समिती, उमराणे, कळवण, चांदवड बाजार समित्यामध्ये आज लिलाव बंद आहेत. तर निफाड, विंचूर, नाशिक बाजार समित्यांमध्ये आज लिलाव पार पडले.
दरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील निफाड, विंचुर, नाशिक बाजार समित्यामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यानुसार निफाड बाजार समितीमध्ये जवळपास 144 नगांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1851 रुपयांचा बाजारभाव मिळाला. विंचूर बाजार समितीमध्ये आज सकाळी 319 नगांची आवक झाली. तर दुपारी 250 नगांची आवक झाली. त्यानुसार दुपारच्या सत्रातील लिलाव सुरु आहेत. सकाळच्या दर अहवालानुसार या बाजार समितीत कमीत कमी 1000 रुपये तर 1850 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. तर नाशिक बाजार समितीत लिलाव प्रक्रिया सुरु असून सायंकाळी उशिरा बाजारभाव समोर येणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कांदा निर्यात बंदींनंतर...
एकीकडे कांदा निर्यात बंदी हटविल्याचे बोलले जात आहे. तर कांदा उत्पादक संघटनांकडून अद्याप असा जीआर आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. संभ्रमावस्थेत आहेत. त्यातच काल रविवार ची सुट्टी आज शिवजयंतीची सुट्टी यामुळे आल्याने आवक देखील कमी असल्याचे चित्र आहे. आता उद्या निर्यातबंदीनंतरचे चित्र स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याचा बाजारभावाचा विचार केला असता कालपासून बाजारभावात बदल झाल्याचे चित्र दिसत आहे.