Join us

कांदा दरात घसरण कायम, आजचे कांदा बाजारभाव काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 4:52 PM

गेल्या तीन-चार दिवसांपासून समाधानकारक असलेले कांदा दर आज पुन्हा गडगडल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या तीन-चार दिवसांपासून समाधानकारक असलेले कांदा दर आज पुन्हा गडगडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायम असल्याचे चित्र आहे. आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. म्हणजे जवळपास दीडशे रुपयांनी दर घसरले. तर येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याला जवळपास 1600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. काल प्रति क्विंटलला 1800 रुपये दर होता. म्हणजे या बाजार समितीतही दोनशे रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 

आज 3 जानेवारी 2024रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 105 नगांची आवक झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1011 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. येवला बाजार समितीत लाल कांद्याची 12000 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 4500 क्विंटल इतकी आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 200 रुपये क्विंटल, तर सरासरी 1700 रुपये इतका दर मिळाला. 

तर सिन्नर बाजारसमितीमध्ये लाल कांद्याची 2068 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500    रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये पोळ कांद्याची 11700 क्विंटल इतकी आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 400 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1750 रुपये इतका दर मिळाला. त्यानुसार अनेक बाजार समित्यांमध्ये आज कांदा दरात घसरण पाहायला मिळाली. 

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव पाहुयात....

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/01/2024
कोल्हापूर---क्विंटल559150030001500
अकोला---क्विंटल320120024002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल142940029001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल372200025002250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13955160026002100
खेड-चाकण---क्विंटल280100025001800
सातारा---क्विंटल427100022001600
हिंगणा---क्विंटल1250025002500
येवलालालक्विंटल1200060017981600
धुळेलालक्विंटल247825019501450
जळगावलालक्विंटल249452718151250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1500070019681750
नागपूरलालक्विंटल1940150022002025
सिन्नरलालक्विंटल206850018861700
सिन्नर - नायगावलालक्विंटल73250018391700
मनमाडलालक्विंटल450020018141700
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल255150018051500
साक्रीलालक्विंटल460130018501850
भुसावळलालक्विंटल29100015001300
दिंडोरी-वणीलालक्विंटल4696161128012075
वैजापूरलालक्विंटल578100021001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल470350025001500
पुणेलोकलक्विंटल12810100032002100
पुणे- खडकीलोकलक्विंटल8120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1800800800
पुणे-मोशीलोकलक्विंटल85650015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1900120018111650
मलकापूरलोकलक्विंटल33090521211500
वाईलोकलक्विंटल15150035002250
कामठीलोकलक्विंटल6200030002500
नागपूरपांढराक्विंटल1000160022002050
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1170040022561750
टॅग्स :नाशिकमार्केट यार्डकांदा