नंदुरबार : नंदुरबार जिल्हा मिरची (Nandurbar Mirchi Market) उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. येथील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात मिरचीची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील मिरचीला महाराष्ट्राबाहेर देखील मागणी आहे. मात्र, उत्पादकांना पाहिजे तसा भाव अजूनही मिळत नसून शासन हमीभाव (Mirchi MSP) देण्याकडेही दुर्लक्ष करत असल्याने मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसर मिरची पिकासाठी (Mirchi Production) जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील मिरचीची मागणी दूरपर्यंत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करून उत्पन्न घेतले जाते. सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत मिरची पिकाची पूर्णतः लागवड आटोपली असून सध्या मिरची पीक चांगलेच बहरून आले आहे; मात्र सद्यस्थितीत अपेक्षित बाजारभाव नाही, शिवाय मिरची हमीभावात नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
नंदुरबारच्या मिरचीला हमीभाव मिळावा म्हणून सतत शासनाकडे मागणीदेखील केली जाते; परंतु शासन मिरचीला हमीभाव देण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे शासनाची अन्यायकारक भूमिका लक्षात न घेता मिरची उत्पादक शेतकरी आधुनिक शेती पद्धतीचा उपयोग करून मिरची उत्पादन वाढविण्याचा सतत प्रयत्न करतात. आता सध्या या परिसरातील मिरची पीक चांगलेच बहरून आले आहे.
मिरचीला काय भाव मिळतोय?
आज लाल मिरचीला मुंबई बाजारात कमीत कमी 18 हजार रुपये तर सरासरी 29 हजार रुपये भाव मिळाला. तर काल नागपूर बाजारात कमीत कमी 13 हजार रुपये, तर सरासरी 14500 रुपये, तर 16 नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारात कमीत कमी 2650 रुपये, तर सरासरी 10 हजार 500 रुपये असा दर मिळाला. 15 नोव्हेंबर रोजी अकोला बाजारात हायब्रीड मिरचीला कमीत कमी 05 हजार रुपये तर सरासरी 07 हजार रुपयांचा दर मिळाला. तर हिरव्या मिरचीला पुणे बाजारात 2250 रुपये, मुंबई बाजारात ज्वाला मिरचीला 05 हजार रुपये, कोल्हापूर बाजारात 2300 रुपये, सोलापूर बाजारात 830 रुपये, नागपूर बाजारात 1025 रुपये असा दर मिळतो आहे.
हेही वाचा : Mirchi Market : मुंबई बाजारात लाल मिरचीचा तोरा वाढला, अकोला, नागपूरमध्ये काय भाव?