गडचिरोली : लाल मिरची (Red Chilly) सुमारे २०० ते २५० रुपये किलो दराने मिरची विकली जात आहे. आजच्या बाजार अहवालानुसार मुंबई बाजारात क्विंटलला (Mumbai Mirchi Market) कमीत कमी 18 हजार रुपये तर सरासरी 29 हजार रुपये, नागपूर बाजारात कमीत कमी 13 हजार रुपये, तर सरासरी 14 हजार 500 रुपये तर अकोला बाजारात कमीत कमी 15 हजार रुपये तर सरासरी 18 हजार रुपये इतका दर मिळतो आहे.
ग्रामीण भागातील तर सर्वच नागरिक मिरची खरेदी करूनच तिखट तयार करतात. त्यामुळे पावसाळा वगळता जवळपास दहा महिने मिरची खरेदी केली जात असल्याने प्रत्येक आठवडी बाजारात दुकाने लागतात. बारीक मिरची अतिशय तिखट असते. मात्र, ती स्वस्त असल्याने अनेक नागरिक ही मिरची खरेदी करतात. नंदुरबार मिरची मार्केटला चांगली आवक असून ती ओली मिरची आहे. तर दुसरीकडे आज बाजारात २८० क्विंटलची आवक झाल्याचे दिसून आले.
प्रत्येक गावी भरतो मिरचीचा स्वतंत्र बाजार पावसाळ्याचे जवळपास चार महिने वगळता वर्षभर लाल मिरची खरेदी केली जाते. त्यामुळे व्यापारीवर्ग प्रत्येक आठवडी बाजारात लाल मिरची विक्रीस आणतात. प्रत्येक ठिकाणी मिरचीचा स्वतंत्र बाजार भरतो. मिरचीचा प्रकार बघून किंमत ठरत असते. हिवाळा सुरुवात होताच लाल मिरचीची मागणी वाढली आहे.
गावठी मिरचीचा सर्वाधिक भाव
गावठी मिरचीची चव अतिशय चांगली असते. मात्र, या मिरचीचे उत्पादन कमी होत असल्याने त्याची आवक कमी असल्याने त्याचा भाव अधिक राहतो. बहुतांश नागरिक हीच मिरची खरेदी करतात. पावसाळ्याचे जवळपास चार महिने वगळता वर्षभर लाल मिरची खरेदी केली जाते. त्यामुळे व्यापारी वर्ग प्रत्येक आठवडी बाजारात लाल मिरची विक्रीस आणतात. तर तेलंगणा राज्य मिरची पिकाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे. या राज्यातील मिरची स्वस्त मात्र अतिशय तिखट असते. तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जाणारे मजूर मिरची आणतात.
वाचा मिरची बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
11/11/2024 | ||||||
अकोला | --- | क्विंटल | 10 | 15000 | 22000 | 18000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 179 | 13000 | 15000 | 14500 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 90 | 18000 | 40000 | 29000 |
10/11/2024 | ||||||
रामटेक | --- | क्विंटल | 4 | 14000 | 16000 | 15000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 360 | 2000 | 2200 | 2150 |