Lokmat Agro >बाजारहाट > Nafed Onion Issue : नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीत घोटाळा, केंद्रीय समितीला चौकशीचे पत्र

Nafed Onion Issue : नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीत घोटाळा, केंद्रीय समितीला चौकशीचे पत्र

Latest News Nafed and NCCF onion procurement scam, inquiry letter to Central Committee | Nafed Onion Issue : नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीत घोटाळा, केंद्रीय समितीला चौकशीचे पत्र

Nafed Onion Issue : नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीत घोटाळा, केंद्रीय समितीला चौकशीचे पत्र

Onion Issue : प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कांदा (Onion Market) न घेता बाजारातून आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला. 

Onion Issue : प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कांदा (Onion Market) न घेता बाजारातून आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवला. 

शेअर :

Join us
Join usNext

NAFED Onion : केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत यावर्षी नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या दोन संस्थांमार्फत पाच लाख टन कांदा खरेदी (Onion Market) सुरु आहे. या दोन्ही संस्थांकडून प्रत्येकी अडीच लाख टन कांदा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही निवडक फार्मर प्रोडूसर कंपन्या व कंपन्यांचे फेडरेशन यांच्यामार्फत कांदा खरेदी सुरू आहे. ही कांदा खरेदी करताना अनेक फेडरेशन व फार्मर प्रोडूसर कंपन्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांचा कांदा न घेता बाजारातून आधीच स्वस्त दरातील कांदा आपल्या गोडाऊनमध्ये (onion Godam) साठवून ठेवला. 

तसेच काही ठराविक व्यापाऱ्यांकडून कमी दरातील कांदा खरेदी करून हाच कांदा सरकारी (Onion market Rate) बफर स्टॉक म्हणून दाखवण्यात आला आहे. या माध्यमातून कोट्यंवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून केंद्र सरकारकडून या संपूर्ण कांदा खरेदीच्या आर्थिक गैरव्यवराची सखोल चौकशी इडी व सीबीआय मार्फत करावी, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीहून आलेल्या केंद्र सरकारच्या समितीला देण्यात आले. 

फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि फेडरेशनकडून कांदा खरेदी करताना हा संपूर्ण गैरप्रकार करताना संबंधित कंपन्यांनी नात्यातील व काही जवळच्या शेतकऱ्यांचे बँक पासबुक, सातबारा उतारा, आधार कार्ड या कागदपत्रांची पूर्तता करून आधीचा गोडाऊनमधील स्वस्त दरातील कांदा तसेच आता काही ठराविक व्यापाऱ्यांकडून स्वस्तातील कांदा घेऊन हाच कांदा नाफेड एनसीसीएफसाठी खरेदी केल्याचे दाखवले जात असल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून कांदा संघटनेकडे तक्रारी आल्या होत्या. तसेच खुद्द नाफेडचे अध्यक्ष जेठालाल अहिर यांनीही नाशिक जिल्ह्यातील काही खरेदी केंद्रावर भेटी देऊन मागच्याच आठवड्यात संबंधित कांदा खरेदीत बोगसगिरी होत असल्याचे कबुली दिली होती. 

लेखी पत्राद्वारे मागणी 

गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय समिती नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर असून काल नाशिक येथील कृषी विभागाच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी कांदा संघटनेकडून संबंधित समितीला या संपूर्ण कांदा खरेदीच्या आर्थिक गैरव्यवराची ईडी व सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, याबाबत लेखी पत्र देऊन मागणी करण्यात आली. तसेच नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील होणाऱ्या गैरप्रकारला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नाफेडकरून जास्तीत जास्त कांदा दर मिळण्यासाठी काही महत्वाच्या उपाययोजनाही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून केंद्रीय समितीला सुचविण्यात आल्या आहेत. 

संयुक्त बैठकीचे आयोजन.... 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कांदा बियाणे, कांदा उत्पादन, कांदा विक्री व्यवस्था, कांदा निर्यात धोरण तसेच कांदा प्रक्रिया उद्योग आदी  महत्त्वाच्या विषयावर कायमस्वरूपी धोरण ठरवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री, वाणिज्य मंत्री संबंधित विभागाचे अधिकारी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे  शिष्टमंडळ यांची एक संयुक्त बैठक आयोजित करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी केंद्रीय समितीतील केंद्रीय उपकृषी पणन सल्लागार बी के पृष्टी, किमान किंमत समर्थन उपायुक्त बिनोद गिरी, फलोत्पादन (सांख्यिकी) विभागाचे उपसंचालक पंकज कुमार, विपणन अधिकारी सोनाली बागडे, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे कांदा उत्पादक शेतकरी विश्वनाथ पाटील, खंडू फडे आदी उपस्थित होते

Web Title: Latest News Nafed and NCCF onion procurement scam, inquiry letter to Central Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.