नाशिक : 'नॅशनल अॅग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया' (नाफेड), आणि नाशिक जिल्ह्यातील फेडरेशनकडून सुमारे १,५८९ टन इतका कांदा ३५ रुपये दराने खरेदी करून बाजारात चढ्या दराने विक्री करत नाफेडला (Nafed) साडेपाच कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवा मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संशयित काशिनाथ नाईक यांच्याविरुद्ध नाफेडने दिलेल्या फिर्यादीवरून कांद्याच्या घोटाळ्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईक यांनी नाफेडकडील कांदा परस्पर (Kanda Market) नाईक याने २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२४ दरम्यान परस्पर विक्री करत जनतेची व नाफेड कार्यालयाची फसवणूक केली. द्वारका सर्कल येथील नाफेड कार्यालयात गंडा घातला.
नाफेडकडे सुमारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने १ हजार ५८९ टन कांद्याचा नाईकने अपहार करीत त्याची बाजारात चढ्या दराने विक्री करीत स्वतःचा आर्थिक फायदा करत नाफेडला एकूण ५ कोटी ५६ लाख २१ हजार १६० रुपयांना गंडा घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जयंत रमाकांत कारेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्या कंपन्यांवर कारवाई सुरु आहे, त्यातलेच पुढचे प्रकरण हे आहे. नाफेडने बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केला पाहिजे. यासाठी कांदा कलेक्शन करणारी वेगळी संस्था आवश्यक आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी तटस्थ संस्था आवश्यक आहे. कांद्याची क्वालिटी चेक करणारे, ज्यांच्याकडे माल जातोय ते वगेळे असायला हवे, त्यानंतर या कांदा खरेदीत पारदर्शकता येईल. कारण यात कांदा घेणारे हेच, चेक करणारे हेच, यामुळे घोटाळा होत असल्याचे दिसून येते. शिवाय शेतकऱ्यांकडून उतारे घेतले आहेत, याची तपासणी केली पाहिजे.. मोबाईल नंबर नेमके कोणाचे हेही तपासले पाहिजे. तसेच इतरही कंपन्यांची योग्य रित्या चौकशी होणे गरजेचे आहे.
- निवृत्ती न्याहारकर, शेतकरी संघटना, नाशिक