Lokmat Agro >बाजारहाट > Nashik Grape Export : नाशिकहुन रशिया, मलेशियासाठी द्राक्षाचे 109 कंटेनर रवाना, काय भाव मिळाला? 

Nashik Grape Export : नाशिकहुन रशिया, मलेशियासाठी द्राक्षाचे 109 कंटेनर रवाना, काय भाव मिळाला? 

Latest News Nashik Grape Export 109 containers of grapes sent from Nashik to Russia, Malaysia see market price | Nashik Grape Export : नाशिकहुन रशिया, मलेशियासाठी द्राक्षाचे 109 कंटेनर रवाना, काय भाव मिळाला? 

Nashik Grape Export : नाशिकहुन रशिया, मलेशियासाठी द्राक्षाचे 109 कंटेनर रवाना, काय भाव मिळाला? 

Nashik Grape Export : चालू हंगामात अनेक संकटे अंगावर घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी (Grape farmers) पूर्वहंगामी अर्ली द्राक्षांच्या निर्यातीला वेग दिला आहे.

Nashik Grape Export : चालू हंगामात अनेक संकटे अंगावर घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी (Grape farmers) पूर्वहंगामी अर्ली द्राक्षांच्या निर्यातीला वेग दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक ही द्राक्षपंढरी म्हणून ओळखली जाते. चालू हंगामात अनेक संकटे अंगावर घेतलेल्या द्राक्ष उत्पादक (Grape Farmers) शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी अर्ली द्राक्षांच्या निर्यातीला वेग दिला आहे. रशिया, मलेशिया अन् संयुक्त अरब अमिरातीसाठी महिनाभरात (Grape Export) द्राक्षाचे १०९ कंटेनर समुद्रामार्गे रवाना झाले आहेत. १,७६४.५३ मेट्रिक टन द्राक्ष यातून विदेशातील बाजारपेठेत पोहोचले. 

मागील वर्षाच्या तुलनेत पावसामुळे (rainy Season) हंगाम यंदा दोन आठवडे लांबला. सटाणा, देवळा भागातून या हंगामात अर्ली द्राक्षांची (Early Grape Export)  निर्यात होत असते. वर्षभरात नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या हंगामांत साधारणपणे तीन हजारांवर कंटेनर युरोपसह श्रीलंका, यूएई आदी देशांमध्ये रवाना होतात. नाशिकहून युरोप, रशिया, कॅनडा, जर्मनीला द्राक्षांची निर्यात केली जाते. सध्या फक्त दोनच तालुक्यांतून निर्यात सुरू असून, जानेवारीत युरोपात निर्यात वाढेल. त्यासाठी द्राक्षबागांचे प्लॉट बुकिंग सुरू करण्यात येत असते. 

यंदाच्या हंगामात द्राक्षमालाचे खुडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाले होते. त्यास प्रतिकिलो १२३ ते १३५ रुपयांदरम्यान दर मिळाला. कसमादे भागात प्रामुख्याने द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथे ऑक्टोबरपासून खुडे सुरू होतात. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका येथील द्राक्ष उत्पादकांना बसला. मात्र, तरीही समस्येवर मात करत आपल्या मालाची शेतकऱ्यांनी सातासमुद्रापार रवानगी करून उत्पन्नाचे स्रोत शोधले.

एकीकडे नुकसानीमुळे बागाही तुटल्या आहेत. तर चालू हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीचा अवलंब केला, अशा द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झालेले नाही. १०९ कंटेनरमध्ये सर्वाधिक ६० हून अधिक कंटेनर एकट्या रशियासाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळाली.

आता साऊथ आफ्रिकेमार्गे लांबचा प्रवास 
रशिया-युक्रेन युद्धाची धग काहीशी कमी झाली असली तरी त्याचा फटका नाशिकसह भारतातील द्राक्ष निर्यातदारांना बसला आहे. युद्धामुळे द्राक्षांची निर्यात युक्रेनमार्गे न होता दक्षिण आफ्रिकेमार्गेच लांबचा पल्ला गाठून सुरु आहे. त्यामुळे कंटेनरचे भाडेही वाढले आहे. मागील काही वर्षांत दर आठवड्याला जहाजांची उपलब्धता असायची, मात्र आता ते पंधरा दिवसांत होतात.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिक जिल्ह्यातील द्राक्षपट्ट्यात परतीचा पाऊस धो धो बरसला. त्याच वेळेस सटाणा, देवळा भागात अर्ली द्राक्ष तयार होत होते. त्यामुळे फळधारणा होण्यास अडचण आली. परिणामी हंगाम लांबला. 
- लितेश येळवे, कृषी अधिकारी, निर्यात कक्ष

Web Title: Latest News Nashik Grape Export 109 containers of grapes sent from Nashik to Russia, Malaysia see market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.