Nashik Market Yard : दिवाळी (Diwali 2024) अवघ्या एक दिवसांवर आली असून त्या अनुषंगाने पुढील काही दिवस बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या उद्यापासून म्हणजेच २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यातील काही बाजार समित्या दोन दिवस अगोदर सुरु होणार आहेत. तर काही बाजार समित्या दोन दिवस उशिरा दिवाळी सुट्टीनिमित्त बंद ठेवणार आहेत.
सर्व राज्यभर दिवाळी सणांची (Diwali Festival) लगबग सुरु झाली आहे. या कालावधीत अनेक शासकीय कार्यालये, शाळा तसेच आस्थापनांना सुट्ट्या असतात. त्याचबरोबर राज्यातील बाजार समित्यामध्येही काही दिवस लिलाव बंद असतात. शिवाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मजूरही काही दिवस आधीच गावी जात असल्याने परिणामी लिलावावर परिणाम होत असतात. म्हणूनच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik Kanda Market) जिल्ह्यातील बाजार समित्या उद्यापासून बंद राहणार आहेत.
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादन घेतले जाते. यात जिल्ह्यातील चौदाही बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यात विशेषतः कांदा आणि टोमॅटो पिकाची आवक अधिक होत असते. आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हे लिलाव बंद राहणार आहेत. मात्र काही बाजार समित्यांमध्ये अजून एक दिवस किंवा दोन दिवस लिलाव सुरु राहतील, तर अन्य बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
लासलगाव बाजार समिती उपबाजार सूचना
शेतकरी बांधवांना व संबंधित मार्केट घटकांना जाहीर करणेत येते की, 'दीपावली सणानिमिन्त' असल्याने निफाड उपबाजार आवारावरील कांदा लिलाव शनिवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपार सत्रापासुन ते सोमवार, दि.०४ नोव्हेंबर रोजी पर्यंत बंद राहतील. धान्यभूसार लिलाव सोमवार, दि. २८ ऑक्टोबर ते शनिवार दि. ०२ नोव्हेंबर रोजी पर्यंत बंद राहतील. तसेच कांदा व धान्यभूसार खालीलप्रमाणे लिलाव सुरु होतील. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. धान्यभूसार लिलाव सोमवार, दि. ०४ नोव्हेंबर रोजी पासुन सुरु होतील. कांदा लिलाव मंगळवार, दि. ०५ नोव्हेंबर रोजी पासुन सुरु होतील.