नाशिक : दिवाळीच्या दिवसात बहुतांश बाजार समित्या (Nashik Market Yard) बंद असतात. त्यामुळे लाखोचे व्यवहार ठप्प होतात. शिवाय दिवाळीला शेतीमालाची आवकही तितकी नसती. मात्र नाशिक बाजार समितीत शेतीमाल येत असल्याने तेथील व्यवहार सुरू राहणार आहे. तेथे कांदा विक्रीही सुरू असेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करावयाचा आहे, अशा शेतकऱ्यांनी बाजार समितीत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीनिमित्त नाशिक (Nashik) वगळता जिल्ह्यातील इतर बाजार समित्या बुधवारपासून (Diwali Holiday) पाच दिवस बंद राहणार आहेत. गुरुवार ते रविवार हे चार दिवस दिवाळी उत्सवातील महत्त्वाचे दिवस आहेत. पिंपळगाव बसवंत, येवला, निफाड आदी ठिकाणच्या बाजार समित्यामध्ये खरेदी- विक्री व्यवहार ठप्प असतील. नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून काही बाजार समित्यांमध्ये फक्त फूल बाजार व कांदा लिलाव सुरू राहील.
दरम्यान वर्षातून एकदाच तीन ते चार दिवस बाजार समित्या दिवाळीला बंद असतात. चांदवड बाजार समितीत चार दिवस भुसार व कांदा लिलाव बंद असतील. फक्त फुलबाजार पुढचे दोन दिवस बुधवारी व गुरुवारी असे दोन दिवस सुरू राहील. तर नाशिक बाजार समितीत मात्र शेतीमाल येत असल्याने तेथील व्यवहार सुरू राहणार आहे. तेथे कांदा विक्रीही सुरू राहील, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.
दिवाळीत बाजार समित्या बंद
आजपासून पुढील तीन ते चार दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहणार आहेत. काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु राहणार आहेत. बाजार समित्यांमधील मजूर दिवाळीनिमित्त गावी गेल्याने लिलाव बंद आहेत. शिवाय व्यापारी वर्गही गावी गेल्याने बाजार समित्या बंद ठेवण्यात आले आहे.