Lokmat Agro >बाजारहाट > NCCF Onion Price : एनसीसीएफचा 'या' आठवड्याचा कांदा बाजारभाव फुटला? जाणून घ्या सविस्तर

NCCF Onion Price : एनसीसीएफचा 'या' आठवड्याचा कांदा बाजारभाव फुटला? जाणून घ्या सविस्तर

Latest News NCCF Onion Price Today's NCCF onion market price Know in detail  | NCCF Onion Price : एनसीसीएफचा 'या' आठवड्याचा कांदा बाजारभाव फुटला? जाणून घ्या सविस्तर

NCCF Onion Price : एनसीसीएफचा 'या' आठवड्याचा कांदा बाजारभाव फुटला? जाणून घ्या सविस्तर

NCCF Onion Price : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी सुरू आहे.

NCCF Onion Price : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी सुरू आहे.

शेअर :

Join us
Join usNext

NCCF Onion Price : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) माध्यमातून गेल्या काही दिवसापासून कांदा खरेदी (Onion Market) सुरू आहे. नाफेडसह एनसीसीएफ आपला कांदा भाव ठरवत असते. त्यानुसार एनसीसीएफने क्विंटलला 2940 रुपयांचा भाव दिला आहे. शिवाय राज्यातील सर्वच जिल्ह्याकरिता एकच भाव दिल्याचे चित्र आहे. 

आजच्या बाजार भाव अहवालानुसार लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Onion Market) उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी 2751 रुपये तर पिंपळगाव बाजार समिती 03 हजार रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. दुसरीकडे एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू आहे. या ठिकाणी एनसीसीएफने आठवड्यासाठी 2940 रुपये भाव ठरविण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या बाजार अहवालानुसार पिंपळगाव बाजार समितीचा (Pimpalgaon Market) जर विचार केला तर जवळपास 60 रुपयांचा तर लासलगाव बाजार समितीच्या भावात 150 रुपयांचा फरक असल्याचे दिसून येत आहे.

कालचे बाजारभाव पहा 

जर कालच्या बाजारभावाचा विचार केला तर नाशिक बाजार समिती उन्हाळ कांद्याला 2700 रुपये दर मिळाला होता. तर लासलगाव बाजार समितीत 3100 रुपयांचा दर मिळाला होता. पिंपळगाव बाजार समितीत तब्बल 3250 रुपये बाजार भाव मिळाला होता. मात्र आज बाजारभावात घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. लासलगाव बाजार समितीत 150 रुपये तर पिंपळगाव बाजार समितीत 250 रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

आजचे बाजार भाव पाहुयात
उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2600 रुपये, लासलगाव बाजार 2751 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2800 रुपये, सिन्नर नायगाव बाजारात 2850 रुपये, कळवण बाजारात 2500 रुपये, मनमाड बाजारात 2700 रुपये, तर पिंपळगाव बसवंत आणि देवळा बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. कालपेक्षा आज उन्हाळ कांद्याचा बाजार घसरला असल्याचा दिसून आले.

Web Title: Latest News NCCF Onion Price Today's NCCF onion market price Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.