Join us

Wheat Market : शरबती गव्हाचा बाजारभाव वधारला, गुढीपाडव्याला गव्हाला काय मिळाले दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 8:12 PM

आज बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, २१८९, बन्सी लोकल, शरबती गव्हाची आवक झाली. यात सर्वाधिक शरबती गव्हाची आवक झाली. 

आज गव्हाची केवळ 1 हजार क्विंटलची आवक झाली. बहुतांश बाजार समित्यांना सुट्टी असल्याने आवक कमी झाल्याचे दिसून आले. आज गव्हाला सरासरी 2325 रुपयापासून ते  4700 रुपये दर मिळाला. बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण, २१८९, बन्सी लोकल, शरबती गव्हाची आवक झाली. यात सर्वाधिक शरबती गव्हाची आवक झाली. 

आज गुढीपाडव्याच्या दिवशी गव्हाची दिवसभरात 1092 क्विंटल आवक झाली. यात सर्वसाधारण गव्हाला कमीत कमी 2000 तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. त्यानंतर २१८९ गव्हाला शेवगाव बाजार समितीत सरासरी 2600 रुपये तर उमरगा बाजार समितीत 4100 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत दाखल झालेल्या बन्सी गव्हाला 2851 रुपये दर मिळाला. 

कोपरगाव बाजार समितीत लोकल गव्हाला सरासरी 2600 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजार समितीत शरबती गव्हाला कमीत कमी 4200 रुपये तर सरासरी 4700 रुपये दर मिळाला. त्यानुसार आज शरबती गव्हाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले. 

असे आहेत गव्हाचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/04/2024
राहूरी -वांबोरी---क्विंटल71200028002500
राहता---क्विंटल50227627502500
शेवगाव२१८९क्विंटल75250026002600
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल36240026002600
उमरगा२१८९क्विंटल1410041004100
पैठणबन्सीक्विंटल255235030992851
कोपरगावलोकलक्विंटल172235028122600
धडगावलोकलक्विंटल9230023502325
पुणेशरबतीक्विंटल423420052004700
टॅग्स :शेतीमार्केट यार्डगहूपुणे