अवकाळी पावसानंतर सर्वच पिकांना तडाखा बसला. कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले. त्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटली. त्यामुळे पावसाआधीच्या तुलनेत आठवडाभरापूर्वी काहीअंशी भाव वाढले होते. मात्र त्यानंतरच्या आठ दिवसांनंतर बाजारभावात घसरण झाल्याचे चित्र आहे. त्यानुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमीत २ हजार रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.
आठ दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी 2 हजार रु. प्रति क्विंटल, तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव होता. मात्र आज कमीत कमी 2 हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 3960 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळ कांद्याला 4200 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला. या ठिकाणी सकाळच्या सत्रात 2700 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती.
दरम्यान आठ दिवसांपूर्वीचे बाजारभाव लक्षात घेता काही अंशी उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे चित्र आहे. काही बाजारसमित्यांमध्ये जैसे थे दर आहेत. तसेच अवकाळी पावसानंतर आवक कमी झाल्याने भाव वाढले होते. मात्र आता पुन्हा काहीशी आवक वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारभावात काहीसा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांतील आजचे बाजारभाव (रु/प्रति क्विंटल)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 631 | 2500 | 4200 | 3350 |
मुंबई - कांदा बटाटा मार्केट | --- | क्विंटल | 7686 | 2800 | 4700 | 3750 |
राहता | --- | क्विंटल | 942 | 500 | 4500 | 3500 |
मनमाड | लाल | क्विंटल | 1650 | 1900 | 4250 | 3800 |
पुणे | लोकल | क्विंटल | 12472 | 2500 | 4700 | 3600 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 335 | 1500 | 4500 | 3000 |
पिंपळगाव बसवंत | पोळ | क्विंटल | 8100 | 1500 | 4775 | 3800 |
लासलगाव - विंचूर | उन्हाळी | क्विंटल | 4500 | 2000 | 3960 | 3700 |
सिन्नर - नायगाव | उन्हाळी | क्विंटल | 25 | 1000 | 3839 | 3600 |
मनमाड | उन्हाळी | क्विंटल | 850 | 2000 | 3732 | 3500 |
पिंपळगाव बसवंत | उन्हाळी | क्विंटल | 2700 | 1500 | 4356 | 3900 |