Lokmat Agro >बाजारहाट > Nandurbar Kanda Market : नंदुरबारात कांदा मार्केट सुरू, पहिल्याच दिवशी काय भाव मिळाला? 

Nandurbar Kanda Market : नंदुरबारात कांदा मार्केट सुरू, पहिल्याच दिवशी काय भाव मिळाला? 

Latest News Onion market opens in Nandurbar, first days kanda market price see details | Nandurbar Kanda Market : नंदुरबारात कांदा मार्केट सुरू, पहिल्याच दिवशी काय भाव मिळाला? 

Nandurbar Kanda Market : नंदुरबारात कांदा मार्केट सुरू, पहिल्याच दिवशी काय भाव मिळाला? 

Nandurbar Kanda Market : दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातुन बाहेर जाणारी कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे हंगामी स्वतंत्र खुल्या मार्केटला सुरुवात झाली.

Nandurbar Kanda Market : दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातुन बाहेर जाणारी कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे हंगामी स्वतंत्र खुल्या मार्केटला सुरुवात झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Nandurbar Kanda Market :नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हंगामी स्वतंत्र खुल्या कांदा मार्केटचे (Nandurbar Kanda Market) उ‌द्घाटन सोमवारी करण्यात आले. पहिल्याच दिवशी ३०० क्विंटल कांद्यांची आवक झाली असून, एक हजार ८२५ रुपये भाव मिळाला. यंदाच्या उन्हाळी हंगामात (Unhal Kanda) दोन लाख क्विंटल कांद्याची आवक होणार असल्याची शक्यता बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आली. 

एकीकडे कांद्याच्या किंमतीत सातत्याने (Kanda Market Down) घसरण सुरू आहे. अशा स्थितीत आवक वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातुन बाहेर जाणारी कांदा आवक वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या हंगामी स्वतंत्र खुल्या मार्केटला सुरुवात झाली. लिलावासाठी शेतकऱ्यांनी रविवारी रात्रीपासूनच वाहनांमधून कांदे आणलेले होते. 

सुरत, अहमदाबाद, इंदूर मार्केटमध्ये जात होता कांदा...
नंदुरबार तालुक्याचा पूर्व आणि दक्षिणेकडील भाग, नवापूर तालुका, लगतचा साक्री तालुक्यात कांदा लागवडीचे प्रमाण अधिक आहे. या भागातील शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच मार्केट उपलब्ध होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील ते सोयीचे ठरणार आहे. अनेक शेतकरी हे इंदूर, सुरत, अहमदाबाद मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी नेत असतात, मात्र आता स्थानिक ठिकाणी मार्केट उपलब्ध झाले आहे.

यंदा चांगले उत्पादन...
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. विहिरी, कूपनलिकांना चांगले पाणी आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये देखील पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा खरीप आणि रब्बीचा चांगला कांदा बहरला आहे. त्यामुळे यंदा कांदा आवक मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने बाजार समितीने कांदा खरेदीची तयारी केली आहे. व्यापारीही नियोजनात आहेत.

प्रतवारीनुसार दिला जातोय कांद्याला भाव...
कांद्याला प्रतवारीनुसार भाव देण्यात येत असतो. पहिल्याच दिवशी सोमवारी ३०० क्विंटल कांद्याची आवक झाली. साधारणतः पंधराशे ते अठराशे पंचवीस रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार भाव मिळाला. मागील वर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची दिसून आले होते. ५० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. 

Web Title: Latest News Onion market opens in Nandurbar, first days kanda market price see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.