Join us

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाव टिकून, मागील सात दिवसांचा दर कसा राहिला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 5:08 PM

Kanda Bajarbhav : नाशिक जिल्ह्याची परिस्थिती पाहता लासलगाव पिंपळगाव आदी बाजार समितीचे इतर बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव टिकून आहेत.

Kanda Bajarbhav : नाशिकसह राज्यातील कांदा बाजार भाव (Kanda Market) टिकून असून मागील सात दिवसांचे बाजारभाव पाहिले असता सरासरी 3000 ते 3500 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळतो आहे. एकूणच नाशिक जिल्ह्याची परिस्थिती पाहता लासलगाव पिंपळगाव आदी बाजार समितीचे इतर बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव टिकून आहेत.

मागील सात दिवसांचे बाजारभाव (Onion Market Price) पाहिले असता 11 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 2074 क्विंटलचे आवक झाली. या कांद्याला सरासरी 3450 रुपये दर मिळाला. 12 ऑगस्ट रोजी ही आवक वाढून जिल्ह्यात 01 लाख 81 हजार इतकी उन्हाळ कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 3409 रुपयांचा दर मिळाला. 13 ऑगस्ट रोजी उन्हाळ कांद्याची 03 हजार 372 क्विंटलची आवक होऊन सरासरी 3417 रुपये दर मिळाला. 

14 ऑगस्ट रोजी कांद्याची 01 लाख 64 हजार 372 क्विंटल आवक होऊन सरासरी 03 हजार 182 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 16 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 67 हजार 988 क्विंटल ची आवक झाली. या कांद्याला सरासरी 3158 रुपये दर मिळाला. तर आज म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी उन्हाळ कांद्याची 38 हजार 113 क्विंटलची आवक झाली. असून सरासरी 3161 रुपये दर मिळाला आहे. त्यानुसार गेल्या सात दिवसांत मिळालेला दर हा टिकून असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक