Join us

Onion Market : दीप अमावस्येला कांद्याला काय भाव, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 6:19 PM

Onion Market : रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 18104 क्विंटलची कांद्याची (Onion Market) आवक झाली. रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पार पडले. यात आज कांद्याला सरासरी 02 हजार रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज सर्वसाधारण कांद्याची 7 हजार क्विंटलचे आवक झाली. यात दौंड-केडगाव बाजारात 2600 रुपये,  सातारा बाजारात 2500 रुपये, तर राहता बाजारात 2400 रुपये दर मिळाला. जुन्नर नारायणगाव बाजारात चिंचवड कांद्याला 02 हजार रुपये दर मिळाला. लोकल कांद्याची पुणे बाजारात 9 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी 2200 रुपये दर मिळाला. 

तर पाथर्डी बाजारात लाल कांद्याला (Kanda Bajarbhav) 02 हजार रुपये, भुसावळ बाजारात 2300 रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्याची 700 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला लासलगाव-निफाड बाजारात 2800 रुपये, तर रामटेक बाजार समिती 4 हजार 100 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/08/2024
अहमदनगर---क्विंटल441150031002400
अहमदनगरलालक्विंटल134100030002000
जळगावलालक्विंटल14180025002300
लातूरलोकलक्विंटल9120300232
नागपूरउन्हाळीक्विंटल14400042004100
नाशिकउन्हाळीक्विंटल695160129212800
पुणे---क्विंटल2992170031002600
पुणेलोकलक्विंटल9509160028752238
पुणेचिंचवडक्विंटल2470028002000
सातारा---क्विंटल301200030002500
सोलापूरलोकलक्विंटल1271027102710
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)18104
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती