Join us

लाल कांद्याला आज काय भाव मिळाला? कुठे काय बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 3:19 PM

वीस दिवसांहून अधिकच कालावधी लोटला असून अद्यापही कांदा बाजारात बाजारभाव जैसे थे आहेत.

वीस दिवसांहून अधिकच कालावधी लोटला असून अद्यापही कांदा बाजारात बाजारभाव जैसे थे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे चित्र आहे. आज 2024 च्या वर्षातील पहिला दिवस असून आज देखील कांद्याला सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. त्यामुळे महिनाभरापूर्वी तीन हजार रुपयांहून अधिकचा दर असलेला कांदा वीस दिवसांतच निम्म्या दरांवर आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. 

आज 01 जानेवारी 2024 रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 1870 रुपये इतका दर मिळाला. महत्वाचे म्हणजे उन्हाळ कांद्याची आवक पूर्णतः घटली असून लाल कांद्याचाच तोरा बाजारात पाहायला मिळत आहे. तर पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1801 इतका दर मिळाला. त्यानुसार आज लाल कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळाला असे म्हणावे लागेल..तर बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात झाली. 

दरम्यान आज 01  जानेवारी 2024 रोजी लासलगाव बाजारसमितीमध्ये आज लाल कांद्याची 7968 क्विंटल आवक झाली. त्यात या कांद्याला कमीत कमी 911    रुपये दर मिळाला. तर सरासरी 1870 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. येवला अंदरसूल बाजार समितीत लाल कांद्याची 8000 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सरासरी 1850 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 3000 क्विंटल इतकी आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 500 रुपये क्विंटल, तर सरासरी 1750 रुपये इतका दर मिळाला. 

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव पाहुयात...

 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/01/2024
अकोला---क्विंटल547120020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल10832001500850
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7299150024001950
सातारा---क्विंटल298150035002500
कराडहालवाक्विंटल15060020002000
येवलालालक्विंटल1000050019901800
येवला -आंदरसूललालक्विंटल800050020011850
लासलगावलालक्विंटल796891120241870
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1000090020261900
सिन्नर - नायगावलालक्विंटल62850019501850
कळवणलालक्विंटल450080022801300
मनमाडलालक्विंटल300050019231750
दिंडोरी-वणीलालक्विंटल1679129119421621
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल445670023501525
पुणेलोकलक्विंटल805280025001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल18970025001600
मंगळवेढालोकलक्विंटल44320022001400
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1242285020271801
टॅग्स :मार्केट यार्डनाशिककांदा