Lokmat Agro >बाजारहाट > Paddy Market : परभणी चेन्नूर धानाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Paddy Market : परभणी चेन्नूर धानाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Paddy Market Parbhani Chennur paddy market price see dhan todays rate | Paddy Market : परभणी चेन्नूर धानाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Paddy Market : परभणी चेन्नूर धानाला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

Paddy Market : मागील महिनाभरापासून धानाचे भाव प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ९०० च्या दरम्यान स्थिरावले आहेत.

Paddy Market : मागील महिनाभरापासून धानाचे भाव प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ९०० च्या दरम्यान स्थिरावले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : नवीन धान (Paddy Harvesting) काढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी धान बाजारात देखील आणत आहेत. मात्र धानाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील महिनाभरापासून धानाचे भाव प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ९०० च्या दरम्यान स्थिरावले आहेत. यात परभणी चेन्नूर (Parbhani Chennur) समाधानकारक दर मिळत आहे. 

राज्यातील गडचिरोली (Gadchiroli), चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांसह नाशिक, कोकण, पुणे जिल्ह्यात भाताचे (Paddy Production) उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीत काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मागील वर्षी झपाट्याने धानाच्या भावात वाढ झाली होती. डिसेंबर महिन्यात धानाचा भाव सुमारे ३ हजार १०० रुपये झाला होता. यावर्षी सुद्धा असाच भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. सद्यस्थितीत धानाला कमीत कमी २ हजार १०० रुपये तर सरासरी २ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. तर हमीभावाचा विचार केला तर सर्वसाधारण धानाला २३०० रुपये आणि ग्रेड ए धानाला २३२० रुपये ठरविण्यात आला आहे. 

निर्यात शुल्कावर धानाची किंमत अवलंबून 
गडचिरोली जिल्ह्यातील तांदूळ विदेशात निर्यात केला जातो. त्यावर केंद्र सरकारमार्फत निर्यात शुल्क लावले जाते. जर हे निर्यात शुल्क कमी केले तरच धानाचे भाव वाढतील. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाला कशी मागणी आहे. यावर अवलंबून आहे. इतर धान्यांच्या तुलनेत धानाला अतिशय कमी भाव मिळतो; मात्र धान लागवडीचा खर्च अधिक आहे. मागील वर्षीप्रमाणे किमान तीन हजार रूपये एवढा भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांना तोट्याचाच सामना करावा लागणार आहे.

आजचे धान बाजारभाव 
आजचे धानाचे बाजारभाव पाहिले असता गडचिरोली जिल्ह्यात क्रांती धानाला सरासरी २३३६ रुपये, परभणी चेन्नुर धानाला ३३५२ रुपये, जय श्रीराम धानाला २६६० रुपये, जयप्रकाश धानाला ३६७२ रुपये तसेच गोंदिया जिल्ह्यात सोनम धानाला २३९६ रुपये, जय श्रीराम धानाला २६२६ रुपये तर परभणी चेन्नूर धानाला २९२० रुपये दर मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यात एचएमटी धानाला २४२५ रुपये, परभणी चेन्नूर धानाला ३४०० रुपये, तर जय श्रीराम धानाला २४३६ रुपये दर मिळाला.

हेही वाचा : Paddy Registration : धान खरेदी नोंदणीला 'ही' कागदपत्रे आवश्यक, नोंदणी कशी करतात? वाचा सविस्तर

Web Title: Latest News Paddy Market Parbhani Chennur paddy market price see dhan todays rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.