Agriculture News : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार (Sinner Market) समितीच्या ठाणगाव (टेंभूरवाडी) उपबाजार येथील पणन मंडळाच्या शीतगृहासमोरील जागेवर सभापती शशिकांत गाडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून वाटाणा व घेवडा या शेतमालाचे लिलाव सुरू करण्यात आले. सचिन सांगळे या शेतकऱ्याचा वाटाणा शेतमाल १६१ रुपये प्रतिकिलो या उच्च दराने किरण बिन्नर या व्यापाऱ्याने खरेदी केला.
आज पुणे बाजारात (Pune Market Yard) सर्वसाधारण वाटाण्याला क्विंटलमागे 11 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. तर मुंबई बाजार लोकल वाटण्याला 11 हजार 800 रुपये दर मिळाला. मुंबई बाजारातच पांढऱ्या वाटाण्याला (Vatana Bajarbhav) पाच हजार 200 रुपये दर मिळाला. तर 14 ऑगस्ट रोजी च्या बाजारभाव अहवालानुसार पुणे बाजारात सर्वसाधारण वाटाण्याला 11 हजार 100 रुपये, सिन्नर बाजारात 03 हजार 500 रुपये तर पुणे मांजरी बाजार सर्वाधिक 13000 रुपयांचा दर मिळाला.
सांगली बाजारात लोकल वाटण्याला 08 हजार 500 रुपये, नागपूर बाजारात 3550 रुपये, तर मुंबई बाजारात 11 हजार 800 रुपये दर मिळाला. तसेच सिन्नर बाजारात घेवड्याची आवक झाली होती. यात नवनाथ पाटोळे या शेतकऱ्याचा घेवडा शेतमाल ५१ रुपये प्रतिकिलो या उच्च दराने मधुकर बिन्नर या व्यापाऱ्याने खरेदी केला. पहिल्याच दिवशी वाटाण्याची ४० क्विंटल तसेच घेवड्याची २५ क्विंटल आवक झाली.
सुविधा उपलब्ध करण्याची हमीभविष्यात या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शेतकऱ्यांना हमी दिली. परवानाधारक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल इतरत्र खरेदी न करता बाजार समितीचे आवारातच खरेदी करावा, अशा सूचना सभापती गाडे यांनी दिल्या. भविष्यात टोमॅटो व कांदा या शेतमालाचे लिलाव सदर ठिकाणी सुरू करण्याचा मानस संचालकांनी व्यक्त केला.
वाचा आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
16/08/2024 | ||||||
पुणे | --- | क्विंटल | 44 | 10200 | 12200 | 11200 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 1665 | 10000 | 13000 | 11800 |
मुंबई | पांढरा | क्विंटल | 84 | 4000 | 6000 | 5200 |
14/08/2024 | ||||||
पुणे | --- | क्विंटल | 41 | 10200 | 12000 | 11100 |
पुणे-मांजरी | --- | क्विंटल | 6 | 10000 | 16000 | 13000 |
सिन्नर | --- | क्विंटल | 25 | 2500 | 5000 | 3500 |
सांगली | लोकल | क्विंटल | 50 | 8000 | 9000 | 8500 |
जुन्नर -ओतूर | लोकल | क्विंटल | 71 | 5000 | 12010 | 8500 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 20 | 3400 | 3600 | 3550 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 1769 | 10000 | 13000 | 11800 |