Lokmat Agro >बाजारहाट > Nashik Tomato Market : नाशिक मार्केटला भाजीपाल्याला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Nashik Tomato Market : नाशिक मार्केटला भाजीपाल्याला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Latest News Read more about price of vegetables in Nashik market yard see details | Nashik Tomato Market : नाशिक मार्केटला भाजीपाल्याला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Nashik Tomato Market : नाशिक मार्केटला भाजीपाल्याला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Nashik Tomato Market : नाशिकच्या मार्केट यार्डमध्ये फळ भाज्या, पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.

Nashik Tomato Market : नाशिकच्या मार्केट यार्डमध्ये फळ भाज्या, पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : आवक वाढल्यावर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भाज्यांचे दर (Vegetable Market) कमी होतील, अशी दाट शक्यता भाजी विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, टोमॅटोची लाली तेवढी कमी झाली. भेंडीसह बटाटे, कांद्याचे भाव स्थिर आहेत. टोमॅटो मागील आठवड्यात शंभर रुपये होता. तो आता ४० ते ५० रुपये किलो झाला असून, गवार तब्बल १६०, तर शेवगा २०० रुपये किलो आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik Market Yard) जून व जुलैच्या १५ तारखेपर्यंत पावसाचा जोर नव्हता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस यंदाच्या सिझनमधला आतापर्यंतचा सर्वात चांगला पाऊस झाला. त्यानंतरही अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. या दरम्यान आवक कमी होऊन भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यात टोमॅटोला चांगला दर मिळत होता. मात्र पुन्हा एकदा टोमॅटोची (Tomato Market) लाली घसरली आहे. 

बाजार समितीत भाव व आवकमध्ये चढ उतार
नाशिकच्या मार्केट यार्डमध्ये फळ भाज्या, पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. टोमॅटोची लाली उतरली, तर कांदा, बटाट्याची आवक वाढूनही भाव स्थिर राहिले. पावसाने शेतीमालाला फटका बसला, कांद्याचा कमाल भाव तीन हजार ते ३२०० वर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक चार हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,६०० क्विंटलने वाढूनही बटाट्याच्या कमाल भावात ५०० रुपयांची वाढ होऊन बटाट्याला क्विंटलला ३,५०० रुपये भाव मिळाला. लसणाचा क्विंटलला कमाल भाव १७ हजार ५०० रुपयांवरून १८,००० रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची आवक २०६ क्विंटल झाली. मिरचीला ३ हजार रुपयांपासून भाव मिळाला.

आजचे टोमॅटो बाजारभाव 

आज कोल्हापूर बाजारात टोमॅटोला सरासरी 1300 रुपये, अहमदनगर बाजारात 1500 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1300 रुपये, श्रीरामपूर बाजारात 02 हजार रुपये, कल्याण बाजारात 1500 रुपये अकलूज बाजारात 1500 रुपये, पुणे बाजारात 1750 रुपये, वाई बाजारात 1400 रुपये, तर कामठी बाजारात 2500 रुपये आणि रत्नागिरी बाजारात 2200 रुपये दर मिळाला. 

Web Title: Latest News Read more about price of vegetables in Nashik market yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.