Red Onion Market : दसऱ्याच्या मुहूर्तावर आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याचा लिलाव करण्यात आला. बागलाण तालुक्यातील कुपखेडा येथे खासगी बाजार समितीच्या वतीने हा लिलाव करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लिलावास उपस्थिती लावली. तर जवळपास ३०० क्विंटल कांद्याचा लिलाव झाला.
आज विजयादशमी दसरा (Dasara) असून या दिवसाचे औचित्य साधून कुपखेडा येथे मोसम कृषी खाजगी मार्केटचा शुभारंभ पार पडला. सकाळी दहा वाजेपासून लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) खरेदीला सुरवात झाली. यावेळी परिसरात दहा-बारा शेतकऱ्यांनी हजेरी लावली. बागलाण तालुक्यातील नामपूर-नळकस रोडवरील कूपखेडा येथे हे लिलाव पार पडले. यावेळी १८ वाहने दाखल होत ३०० क्विंटल लाल कांद्याचा लिलाव झाला.
या कांद्याला क्विंटलला ७२७२ असा भाव मिळाला. मात्र दसरा मुहूर्तावर मिळालेला भाव असल्याने शेतकऱ्यांनी तो धरू नये. त्यानुसार आज नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या लिलावाला शुभारंभ झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांचा लाल कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल. आज लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याची 228 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला सरासरी 2100 रुपये, मनमाड बाजारात 400 क्विंटल ची आवक होऊन या ठिकाणी 03 हजार रुपये तर भुसावळ बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला.