यवतमाळ : यावर्षी रेशीम कोषाचा (Reshim Kosh Market) हंगाम सुरू झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत रेशीमच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात रेशीम कोषाला ६४० रुपये किलोचे दर मिळत आहे. बीड आणि अमरावतीकडे रेशीम विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यात नवीन पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांनी तुती लागवडीला पसंती दर्शविली आहे.
एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ६५० एकरवर रेशीम पिकांची (Reshim Kosh) लागवड झाली आहे. एकवेळा लागवड झाल्यावर शेतकरी रेशीम पिकाच्या चार ते पाच बॅच उत्पादन घेतात. या पिकाला वन्य प्राण्याचा उपद्रव, हवामान बदलाचा कुठलाही परिणाम होत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांच्या लागवडीकडे आपला मोर्चा हळूहळू वळविण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी रेशीम कोषाला ६०० रुपये किलोचे दर होते. यावर्षी हा दर ६४० रुपये किलोच्या घरात पोहचले आहे.
मागील आठवडाभराचा विचार केला तर रेशीम कोषाला 16 नोव्हेंबर रोजी जालना बाजारात क्विंटलमागे कमीत कमी 43 हजार 500 रुपये तर सरासरी 51 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. 18 नोव्हेंबर रोजी याच बाजारात कमीत कमी 41 हजार रुपये तर सरासरी 55 हजार 500 रुपये, 19 नोव्हेंबर रोजी कमीत कमी 27 हजार 500 रुपये, तर सरासरी 47 हजार 500 रुपये दर मिळाला.
तर 21 नोव्हेंबर रोजी कमीत कमी 11000 रुपये तर सरासरी 45 हजार 500 रुपये आणि 22 नोव्हेंबर रोजी कमीत कमी 44 हजार 500 रुपये तर सरासरी 59 हजार रुपये दर मिळाला. म्हणजेच जशी जशी आवक वाढली, तसतसे भाव देखील वाढत असल्याचं या बाजार अहवालावरून दिसून येते.
वाचा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 11 | 44500 | 64500 | 59000 |
21/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 6 | 11000 | 55500 | 45500 |
19/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 6 | 27500 | 52500 | 47500 |
18/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 11 | 41000 | 61500 | 55500 |
16/11/2024 | ||||||
जालना | पांढरा | क्विंटल | 11 | 43500 | 60000 | 51500 |