Lokmat Agro >बाजारहाट > Rice Market : पावसामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम, तांदळाला काय भाव मिळतोय?

Rice Market : पावसामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम, तांदळाला काय भाव मिळतोय?

Latest News Rice Market Effect on rice production due to rain, see live price Of rice for 1 kg | Rice Market : पावसामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम, तांदळाला काय भाव मिळतोय?

Rice Market : पावसामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम, तांदळाला काय भाव मिळतोय?

Rice Market : मागील तीन चार दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Rice Market : मागील तीन चार दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : एकीकडे खरिपातील भात काढणीला (Rice Crop) आला असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील तीन चार दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. 

इंद्रायणी, कोलममुळे नाशिकची ओळख नाशिक जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध असून इगतपुरी तालुका तर भातशेतीचे आगार आहे. इगतपुरी तालुक्यात १००८. कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भातासह संकरित विकसित वाणालाही पसंती आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटीचा तांदूळ सर्वत्र जातो. नाशिक जिल्ह्यात भात पिकाची लागवड दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक झाली आहे. मात्र काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धान शेतातच खराब होत आहे. 

दरम्यान या पावसाचा परिणाम भाताच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सध्या मागणी कमी आहे. मात्र दिवाळीनंतर तांदळाचे उत्पादन येण्यास सुरवात होते. दिवाळीनंतर चिन्नोर, एचएमटी, वाडा कोलम तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यात तांदळाचे भाव प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. नाशिकमध्ये ३५ टक्के वाडा कोलम, ५० टक्के इंद्रायणी आणि १५ टक्के काली मूंछ तांदळाची विक्री होते. 

तांदळाचे दर असे (प्रति किलो) 
सध्या मसुरी तांदूळ ४० रुपये, काली मूंछ ७० ते ८० रुपये, वाहा कोलम ६५ ते ७० रुपये तर इंद्रायणी तांदूळ ६२ ते ६५ रुपये, आंबेमोहर ७० रुपये, चिनोर ७० रुपये, परिमल ५० रुपये किलो या प्रमाणे आहे.

यावर्षी अति अकाली पावसामुळे बरेच धान शेतातच खराब झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तांदळाचे दर दोन महिन्यांपासून वाढले, जुन्या तांदळालाही मागणी आहे. सामान्य आणि उच्च मध्यमवर्गीयांकडून इंद्रायणी, चिन्नोर तांदळाला मागणी आहे. ऑगस्टच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात भाव वाढले आहेत. 
- अनिल बूब, धान्य व्यापारी, माजी संचालक मार्केट कमिटी

आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/10/2024
पालघर (बेवूर)---क्विंटल190541054105410
वसई---क्विंटल370356048504450
पुणेबसमतीक्विंटल337000120009500
पुणेकोलमक्विंटल674420070005600
अलिबागकोलमक्विंटल10300035003250
मुरुडकोलमक्विंटल10300035003250
सोलापूरमसुराक्विंटल573337070004055
पुणेमसुराक्विंटल414330038003550
मानगाव (भादव)नं. २क्विंटल24200048003500
कर्जत (रायगड)नं. २क्विंटल55420060005100

Web Title: Latest News Rice Market Effect on rice production due to rain, see live price Of rice for 1 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.