नाशिक : एकीकडे खरिपातील भात काढणीला (Rice Crop) आला असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील तीन चार दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असल्याने भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
इंद्रायणी, कोलममुळे नाशिकची ओळख नाशिक जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध असून इगतपुरी तालुका तर भातशेतीचे आगार आहे. इगतपुरी तालुक्यात १००८. कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भातासह संकरित विकसित वाणालाही पसंती आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटीचा तांदूळ सर्वत्र जातो. नाशिक जिल्ह्यात भात पिकाची लागवड दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक झाली आहे. मात्र काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धान शेतातच खराब होत आहे.
दरम्यान या पावसाचा परिणाम भाताच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सध्या मागणी कमी आहे. मात्र दिवाळीनंतर तांदळाचे उत्पादन येण्यास सुरवात होते. दिवाळीनंतर चिन्नोर, एचएमटी, वाडा कोलम तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यात तांदळाचे भाव प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढले आहेत. नाशिकमध्ये ३५ टक्के वाडा कोलम, ५० टक्के इंद्रायणी आणि १५ टक्के काली मूंछ तांदळाची विक्री होते.
तांदळाचे दर असे (प्रति किलो) सध्या मसुरी तांदूळ ४० रुपये, काली मूंछ ७० ते ८० रुपये, वाहा कोलम ६५ ते ७० रुपये तर इंद्रायणी तांदूळ ६२ ते ६५ रुपये, आंबेमोहर ७० रुपये, चिनोर ७० रुपये, परिमल ५० रुपये किलो या प्रमाणे आहे.
यावर्षी अति अकाली पावसामुळे बरेच धान शेतातच खराब झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तांदळाचे दर दोन महिन्यांपासून वाढले, जुन्या तांदळालाही मागणी आहे. सामान्य आणि उच्च मध्यमवर्गीयांकडून इंद्रायणी, चिन्नोर तांदळाला मागणी आहे. ऑगस्टच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात भाव वाढले आहेत. - अनिल बूब, धान्य व्यापारी, माजी संचालक मार्केट कमिटी
आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
19/10/2024 | ||||||
पालघर (बेवूर) | --- | क्विंटल | 190 | 5410 | 5410 | 5410 |
वसई | --- | क्विंटल | 370 | 3560 | 4850 | 4450 |
पुणे | बसमती | क्विंटल | 33 | 7000 | 12000 | 9500 |
पुणे | कोलम | क्विंटल | 674 | 4200 | 7000 | 5600 |
अलिबाग | कोलम | क्विंटल | 10 | 3000 | 3500 | 3250 |
मुरुड | कोलम | क्विंटल | 10 | 3000 | 3500 | 3250 |
सोलापूर | मसुरा | क्विंटल | 573 | 3370 | 7000 | 4055 |
पुणे | मसुरा | क्विंटल | 414 | 3300 | 3800 | 3550 |
मानगाव (भादव) | नं. २ | क्विंटल | 24 | 2000 | 4800 | 3500 |
कर्जत (रायगड) | नं. २ | क्विंटल | 55 | 4200 | 6000 | 5100 |