Join us

Sorghum Market : लातुरात पांढऱ्या ज्वारीला हंगामातील सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 7:05 PM

आज लातूर जिल्ह्यात पांढऱ्या ज्वारीला हंगामातील सर्वाधिक दर मिळाला.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 10 हजार 537 क्विंटल इतकी आवक झाली. आज सर्वाधिक 3309 क्विंटलची शाळू ज्वारीची आवक झाली. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात आज पांढऱ्या ज्वारीला हंगामातील सर्वाधिक 10 हजार 325 रुपये इतका दर मिळाला. तर आज सरासरी 2100 रुपयापासून ते 4000 रुपये दर मिळाला. तसेच आज वसंत ज्वारीची सुद्धा आवक झाली. 

आज 01 एप्रिल 2024  रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ज्वारीची कमी आवक झाली. यात सर्वसाधारण, दादर, हायब्रीड, लोकल, मालदांडी, शाळू पांढरी, रब्बी, वसंत इत्यादी वाणांचा समावेश आहे. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2326 रुपये ते 3600 रुपये दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2321 रुपये ते 2500 रुपये दर मिळाला. 

तर हायब्रीड ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3400 रुपये दर मिळाला. मालदांडी ज्वारीला सरासरी 2786 रुपये ते 4150 रुपयांचा दर पुणे बाजार समितीत मिळाला. मागील काही दिवसांच्या मालदांडी ज्वारीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपये ते 3600 रुपये दर मिळाला. मात्र लातुर जिल्ह्यातील औराद शहाजानी    या बाजार समितीत या ज्वारीला सरासरी 10 हजार 325 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. कल्याण बाजार समितीत आलेल्या वसंत ज्वारीला देखील 4000 रुपयांचा दर मिळाला. 

पाहुयात आजचे सविस्तर ज्वारीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/04/2024
बार्शी---क्विंटल604250045003600
बार्शी -वैराग---क्विंटल505281541413411
मानोरा---क्विंटल48226223902326
जळगावदादरक्विंटल11250025002500
जलगाव - मसावतदादरक्विंटल113245026002525
पाचोरादादरक्विंटल300222224502321
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल136215022502200
नागपूरहायब्रीडक्विंटल1000310035003400
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4240024002400
धडगावहायब्रीडक्विंटल40200021502100
सोलापूरमालदांडीक्विंटल5360036003600
पुणेमालदांडीक्विंटल678360047004150
बीडमालदांडीक्विंटल216188144112786
मोहोळमालदांडीक्विंटल14300032003100
परांडामालदांडीक्विंटल20315035003360
चाळीसगावपांढरीक्विंटल2000190022452100
पाचोरापांढरीक्विंटल925215023002231
औराद शहाजानीपांढरीक्विंटल27101501050010325
मुरुमपांढरीक्विंटल55262643113469
तुळजापूरपांढरीक्विंटल115250040003500
उमरगापांढरीक्विंटल2262034003010
पाथरीपांढरीक्विंटल14220028002600
दुधणीपांढरीक्विंटल259281541003600
गेवराईरब्बीक्विंटल42200031502575
जालनाशाळूक्विंटल3309190044992800
परतूरशाळूक्विंटल17207122252100
देउळगाव राजाशाळूक्विंटल75200027002400
कल्याणवसंतक्विंटल3380042004000
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीलातूरपुणे