Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Market : यंदा सोयाबीनला कमी भाव असण्याचे कारण काय? दर कसे बदलत गेले? वाचा सविस्तर

Soyabean Market : यंदा सोयाबीनला कमी भाव असण्याचे कारण काय? दर कसे बदलत गेले? वाचा सविस्तर

Latest News Soyabean bajarbhav last five years market price of soybeans Read in detail  | Soyabean Market : यंदा सोयाबीनला कमी भाव असण्याचे कारण काय? दर कसे बदलत गेले? वाचा सविस्तर

Soyabean Market : यंदा सोयाबीनला कमी भाव असण्याचे कारण काय? दर कसे बदलत गेले? वाचा सविस्तर

Soyabean Market : मागील पाच वर्षे नेमके सोयाबीनचे दर (Last Five Years Soyabean Rate) कसे बदलत गेले, ते समजून घेऊया.... 

Soyabean Market : मागील पाच वर्षे नेमके सोयाबीनचे दर (Last Five Years Soyabean Rate) कसे बदलत गेले, ते समजून घेऊया.... 

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Market : सोयाबीनच्या कायम दबावात (Soyabean Market) असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोयाबीनला सध्या प्रतिक्विंटल ३,९०० रुपये ते ४,३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर यंदा साेयाबीनला मिळणारा दर हा कमी असल्याचे स्पष्ट हाेते. एकीकडे, सोया ढेपेची निर्यात मंदावल्याने सोयाबीनचे दर दबावात आले आहेत. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील शेतकरी साेयाबीनला प्रतिक्विंटल ६,००० रुपये दर मिळावा, अशी मागणी करीत आहेत. मागील पाच वर्षे नेमके सोयाबीनचे दर (Soyabean Market) कसे बदलत गेले, ते समजून घेऊया.... 

यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soyabean Farmer) चिंतेत आहेत. एकीकडे सोयाबीन काढणी सुरू असून, राज्यातील बाजारपेठांमध्ये साेयाबीनची आवक कमी व स्थिर असल्याचे दिसून येत आहे. साेयाबीनला मिळणारा दर परवडणारा नसल्याने शेतकरी साेयाबीनची विक्री करताना अत्यंत सावधगिरीने पाऊल टाकत आहेत. त्यातच मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीनच्या पिकाची धूळधाण केली आहे. या पावसामुळे विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीनच्या पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. त्यापूर्वीच्या प्रतिकूल हवामान, सततचा पाऊस व राेगाच्या प्रादुर्भावामुळे साेयाबीनचे उत्पादन घटले असून, खर्चात मात्र माेठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत सोयाबीन दर काही केल्या वाढत नसल्याचे दिसतंय. यंदा सोयाबीनची एमएसपी जरी ४,८९२ रुपये असली तरीही भाव मात्र ४,३०० रुपयांची पातळी ओलांडत नाही.  

बाजारभाव आणि एमएसपीचा विचार केला तर सन २०१९-२० मध्ये सरासरी बाजारभाव ३,४२० रुपये, तर एमएसपी ३,७१० रुपये, २०२०-२१ मध्ये सरासरी बाजारभाव ४,१६६ रुपये, तर एमएसपी ३,८८० रुपये, २०२१-२२ मध्ये सरासरी बाजारभाव ८,४९९ रुपये, तर एमएसपी ३,९५० रुपये, २०२२-२३ मध्ये सरासरी बाजारभाव ४,९५१ रुपये, तर एमएसपी ४,३०० रुपये, २०२३-२४ मध्ये सरासरी बाजारभाव ४,१५० रुपये, तर एमएसपी ४,६०० रुपये हाेती. यंदा म्हणजेच २०२४-२५ मध्ये साेयाबीनचा सरासरी बाजारभाव ३,९०० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल असून, एमएसपी ४,८९२ रुपये आहे. साेयाबीनला एमएसपीपेक्षा कमी दर मिळत असताना सरकार खरेदी करायला तयार नाही. (Last Five Years Soyabean Market)
 

केवळ त्याचवर्षी.... 
आता यात सन २०२१-२२ मध्ये सोयाबीनचे सरासरी बाजारभाव समाधानकारक होते. त्यावर्षी जुलै महिन्यात अकोट मार्केटला एका दिवसासाठी १२ हजार रुपये इतका भाव मिळाला होता. तर महाराष्ट्रातील इतर बाजारपेठांमध्ये किमान १० हजार रुपये भाव मिळाला होता. मात्र केवळ एका दिवसासाठी हा बाजारभाव होता. याच काळात ऑल इंडिया पोल्ट्री असोसिएशन केंद्र सरकारकडे जीएम सोया पेंड आयात करण्यासाठी परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने त्यांच्या दबावामुळे जीएम साेया ढेपेच्या आयातीला परवानगी दिली आणि साेयाबीनचे दर काेसळत ६,५०० रुपयांवर येऊन स्थिरावले. त्यानंतर साेयाबीनच्या दराने ६,००० रुपयांची पातळी गाठली नाही. त्यावर्षी देशात सोया ढेपेचे दर अधिक होते तर आंतराराष्ट्रीय पातळीवर कमी होते. ही स्थिती आजही कायम आहे.

म्हणून दर दबावात.... 
त्यानंतर पुढील दोन वर्ष सातत्याने पाऊस असल्याने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन ढेप फारशी निर्यात झाली नाही. सद्यस्थितीत देशात सोया ढेपेचे दर प्रति क्विंटल ३,५०० ते ३,८०० रुपये आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते प्रतिक्विंटल २,७०० रुपये आहेत. त्यामुळे सोयाबीनचे दर दबावात असल्याचे चित्र आहे. अशी परिस्थिती असताना वातावरणाच्या बदलामुळे उत्पादन घटत आहे, उत्पादन खर्च वाढत आहे. त्यात बाजारभाव कमी आहेत, यात शेतकऱ्यांचे मरण आहे, वास्तव नाकारून चालणार नाही...

Onion Export: निर्यात घटल्याने यंदा शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळतोय कमी बाजारभाव

Web Title: Latest News Soyabean bajarbhav last five years market price of soybeans Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.