Join us

Soyabean Market : यंदा सोयाबीनला कमी भाव असण्याचे कारण काय? दर कसे बदलत गेले? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 7:42 PM

Soyabean Market : मागील पाच वर्षे नेमके सोयाबीनचे दर (Last Five Years Soyabean Rate) कसे बदलत गेले, ते समजून घेऊया.... 

Soyabean Market : सोयाबीनच्या पडत्या दरामुळे (Soyabean Market) शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या सोयाबीनला ३९०० रुपये ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर यंदा सर्वात कमी दर असल्याचे चित्र आहे. एकीकडे सोया ढेपेचे दर कमी असल्याने सोयाबीनचे दर दबावात असल्याचे बाजारातील वास्तव आहे. मागील पाच वर्षे नेमके सोयाबीनचे दर (Last Five Years Soyabean Rate) कसे बदलत गेले, ते समजून घेऊया.... 

यंदा सोयाबीन उत्पादक (Soyabean Farmer) शेतकरी चिंतेत आहेत. एकीकडे सोयाबीन काढणी सुरु असून आवक मात्र कमी-अधिक असल्याचे दिसते आहे. कारण सोयाबीनचे दर दबावात असल्याने शेतकरी सावधगिरीने पाऊल टाकत आहेत. त्यातच मागील काही दिवसात झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाची धूळधाण केली आहे. अनेक क्षेत्रावरील सोयाबीनचे मोठं नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सोयाबीन दर काही केल्या वाढत नसल्याचे दिसतंय. यंदा सोयाबीनला एमएसपी जरी ४ हजार ८९२ रुपये असली तरीही भाव मात्र ४ हजार ३०० रुपयांपर्यंत आहेत. 

बाजारभाव आणि एमएसपीचा विचार केला तर २०१९-२० साली सरासरी बाजारभाव ३४२० रुपये, तर एमएसपी ३७१० रुपये, २०-२१ साली सरासरी बाजारभाव ४१६६ रुपये, तर एमएसपी ३८८० रुपये, २१-२२ साली सरासरी बाजारभाव ८४९९ रुपये, तर एमएसपी ३९५० रुपये, २२-२३ साली सरासरी बाजारभाव ४९५१ रुपये, तर एमएसपी ४३०० रुपये, २३-२४ साली सरासरी बाजारभाव ४१५० रुपये, ४६०० रुपये, तर यंदा म्हणजेच २४-२५ साली सरासरी बाजारभाव ३९००-४००० रुपये, तर एमएसपी ४८९२ रुपये ठरविण्यात आली आहे. 

केवळ त्याचवर्षी.... 

आता यात २०२१-२२ मध्ये सोयाबीनचे सरासरी बाजारभाव (soyabean Bajarbhav) समाधानकारक होते. त्यावर्षी जुलै महिन्यात अकोट मार्केटला एका दिवसासाठी १२ हजार रुपये इतका भाव मिळाला होता. तर महाराष्ट्र १० हजार रुपये भाव मिळाला होता. मात्र केवळ एका दिवसासाठी हा बाजारभाव होता. मात्र त्यानंतर आवक कमी झाली, दर वाढल्याचे सांगून ऑल इंडिया पोल्ट्री असोसिएशन केंद्र सरकारला पत्राद्वारे जीएम सोया पेंड आयात करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे त्यानंतर सोयाबीनचे दर पडले होते. त्यावर्षी देशात सोया ढेपेचे दर अधिक होते तर आंतराराष्ट्रीय पातळीवर कमी होते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. 

म्हणून दर दबावात.... 

त्यानंतर पुढील दोन वर्ष सातत्याने पाऊस असल्याने सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन ढेप निर्यात झाली नाही. सद्यस्थितीत देशात सोया ढेपेचे दर  ३५०० ते ३८०० रुपये आहेत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर २७०० रुपये आहेत. त्यामुळे सोयाबीनचे दर दबावात असल्याचे चित्र आहे. अशी परिस्थिती असताना वातावरणाच्या बदलामुळे उत्पादन घटत आहे, उत्पादन खर्च वाढत आहे. त्यात बाजारभाव कमी आहेत, यात शेतकऱ्यांचे मरण आहे, वास्तव नाकारून चालणार नाही... 

 

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती