जळगाव : यंदा कापसाला भाव नाही, सोयाबीनलाहमीभाव (Soyabean Hamibhav) आहे; पण, शासनाच्या निकषात बसत नसल्याने खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रति क्विंटल नुकसान सहन करीत सोयाबीन विकावे लागत आहे. सरकारी हमीभावापेक्षा १८ टक्क्यांनी कमीच भाव सोयाबीनला मिळत आहे.
एकीकडे सोयाबीनला (Soyabean Market) ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव असताना खुल्या बाजारात ४१०० रुपयांच्या जवळपासच भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यात केवळ १० टक्के आर्द्रता अर्थात सुका सोयाबीन (Soyaben Moisture) असावा अशी अट आहे. १२ ते १४ टक्के आर्द्रता असलेला सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतला जात नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात ४,१०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरानेच सोयाबीन विकावा लागत आहे. सोयाबीन खरेदीचे ह्या वर्षाचे उद्दिष्ट १५ लाख क्विंटलचे आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त ३० हजार क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचे सातशे रुपयांचे नुकसान
जळगाव जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी म्हणाले कि, जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामात २० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. ही लागवड अंदाजित पाच टक्क्यांवर आहे. तर आडत व्यापारी पवन अग्रवाल म्हणाले की, सोयाबीनमधील आर्द्रता १२ ते १४ टक्के आहे. शासकीय केंद्रांवर एवढ्या आर्द्रतेचे सोयाबीन खरेदी केले जात नाही. त्यामुळे सध्या ४१०० ते ४१५० रुपये दराने सोयाबीन खरेदी करत आहे.
वाचा बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
04/12/2024 | ||||||
तुळजापूर | --- | क्विंटल | 475 | 4200 | 4200 | 4200 |
लातूर | पिवळा | क्विंटल | 25643 | 4181 | 4370 | 4200 |
हिंगोली- खानेगाव नाका | पिवळा | क्विंटल | 356 | 3850 | 4200 | 4025 |
गंगाखेड | पिवळा | क्विंटल | 60 | 4300 | 4400 | 4350 |
वरूड | पिवळा | क्विंटल | 312 | 3100 | 4200 | 3798 |
कळंब (यवतमाळ) | पिवळा | क्विंटल | 245 | 3850 | 4250 | 4100 |