Join us

Soyabean Market : मागील आठवड्यात सोयबीनच्या आवकेत 17 टक्क्यांची घट, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 4:33 PM

Soyabean Market : गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर ​​​​​​​(Soyabean Market) स्थिर असून हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे.

Soyabean Market : गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर (Soyabean Market) स्थिर असून हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे बाजारातील चित्र आहे. मागील आठवड्याचा आढावा घेतला असता सरासरी 04 हजार 177 रुपये भाव मिळाला आहे. एकूणच मागील आठवड्यात काय बाजार भाव मिळाला व कशी होती ते सविस्तर पाहूयात..

तर मागील आठवड्यात बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभाव (Soyabean Bajarbhav) पाहिला असता मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात क्विंटलमागे 4 हजार 272 रुपये, अकोला बाजारात 4 हजार 177 रुपये, अमरावती बाजारात 4 हजार 128 रुपये, वाशीम बाजारात 4 हजार 175 रुपये, तर लातूर बाजारात 4 हजार 364 रुपये दर मिळाला होता. मागील आठवड्यात अकोला बाजारात (Akola Market Yard) सोयाबीनची सरासरी किंमत रु. 4177 प्रती क्विटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत 1 टक्के घट झाली आहे.

सध्या सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर १७ टक्केनी घट झाली आहे. सोयाबीनची खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. मागील आठवड्योत प्रमुख बाजारपैकी लातूर बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती सर्वाधिक होत्या (रु.४३६४/निव.) तर अमरावती बाजारात सरासरी किंमती रु. ४१२८/क्वि. होत्या.

आजचे मका बाजारभाव 

तर आजचे बाजारभाव पाहिले असता आजच्या बाजार अहवालानुसार अमरावती बाजारात सर्वसाधारण सोयाबीनला 4125 रुपये, बुलढाणा बाजारात पिवळ्या सोयाबीनला 4164 रुपये, लातूर बाजारात 4366 रुपये, परभणी बाजारात 4283 रुपये, नागपूर बाजारात लोकल सोयाबीनला 4075 रुपये, अकोला बाजारात 4140 रुपये, यवतमाळ बाजारात 4101 रुपये तर बीड बाजारात 4237 रुपये दर मिळाला.

टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीअकोला