Soyabean Market : मागील आठवड्यात लातूर बाजारात सोयाबीनची (Soyabean Market) सरासरी किंमत रु. ४२२५ प्रती क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत २ टक्के वाढ झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर १९ टक्क्यांनी घट झाली आहे.
सोयाबीनची खरीप हंगाम (kharif Season) २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु.४८९२ प्रती क्विटल जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या लातूर बाजारात सोयाबीनच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. मागील आठवड्यात प्रमुख बाजारापैकी वाशीम बाजारात सोयाबीनच्या सरासरी किंमती ४३८६ रुपये क्विंटल अशा सर्वाधिक होत्या. तर अमरावती बाजारात सरासरी किंमती ४०५४ रुपये क्विंटल कमी होत्या.
लातूर बाजाराचा विचार केला तर मागील आठवड्यात सोयाबीनच्या किमती २० ऑक्टोबर रोजी ४ हजार ३०० रुपये, २७ ऑक्टोबर रोजी ०४ हजार २०० ते ०४ हजार ३०० रुपये, 3 नोव्हेंबर रोजी ०४ हजार १०० ते ०४ हजार २०० रुपये, १० नोव्हेंबर रोजी ०४ हजार २०० ते ०४ हजार ३०० रुपये, तर २४ नोव्हेंबर रोजी ०४ हजार २२५ रुपयांपर्यंत दर मिळाला.
सोयाबीनच्या आवकेचा विचार जर केला तर २० ऑक्टोबर रोजी अवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. ०३ नोव्हेंबरपर्यंत ही आवक कमी होत गेली ०३ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. मात्र नोव्हेंबरच्या शेवटी आवक पुन्हा घसरली असल्याचं अहवालावरून दिसून येते. काही प्रमुख बाजारांचा विचार केला तर मध्य प्रदेशातील इंदोर बाजारात ०४ हजार २२८ रुपये अकोला बाजारात ०४ हजार १९६ रुपये अमरावती बाजारात ०४ हजार ५४ रुपये, वाशिम बाजारात ०४ हजार ३८६ रुपये, लातूर बाजार ०४ हजार २२२५ रुपये अशी सरासरी किंमत मिळाली.